फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन भारतात पोहोचले; जयपूरमध्ये राजस्थानी शैलीत स्वागत

पुढारी ऑनलाईन डेस्क : २६ जानेवारी हा देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या प्रजासत्ताक दिनाची शोभा यात्रा ही खास विशेष आकर्षण असते. यंदाच्या शोभा यात्रेसाठी लाभलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे भारतात दाखल झाले आहेत. जयपूरचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी त्यांचे स्वागत करतानाचे काही फोटो एक्सवर पोस्ट केले आहेत. (Emmanuel Macron In India) उद्या … The post फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन भारतात पोहोचले; जयपूरमध्ये राजस्थानी शैलीत स्वागत appeared first on पुढारी.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन भारतात पोहोचले; जयपूरमध्ये राजस्थानी शैलीत स्वागत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : २६ जानेवारी हा देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या प्रजासत्ताक दिनाची शोभा यात्रा ही खास विशेष आकर्षण असते. यंदाच्या शोभा यात्रेसाठी लाभलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे भारतात दाखल झाले आहेत. जयपूरचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी त्यांचे स्वागत करतानाचे काही फोटो एक्सवर पोस्ट केले आहेत. (Emmanuel Macron In India)
उद्या (दि. २५) प्रजासत्ताक दिनाच्या शोभा यात्रेचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी भारतात आले आहेत. आज (दि. २५) दुपारी ते जयपूरमध्ये पोहोचले. ते 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. मॅक्रॉन हे दिल्लीला न जाता पॅरिसहून थेट जयपूरला पोहोचले आहेत. येथे आमेर किल्ल्यावर त्यांचे राजस्थानी शैलीत स्वागत करण्यात आले. मॅक्रॉन यांची भेट भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या २५ व्या वर्धापन दिनाच्या समारंभामुळे विशेष ठरणार आहे. (Emmanuel Macron In India)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयपूरच्या जंतरमंतरवर पोहोचत मॅक्रॉन यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली. काही वेळाने दोन्ही नेते रोड शो करणार आहेत. यानंतर ते हवा महलासमोर चहा पितील. रामबाग हॉटेलमध्ये दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय चर्चा होणार आहे. मॅक्रॉन रात्री दिल्लीला रवाना होतील. (Emmanuel Macron In India)

Bienvenue en Inde!
President @EmmanuelMacron of France warmly welcomed by Governor @KalrajMishra of Rajasthan, EAM @DrSJaishankar & CM @BhajanlalBjp of Rajasthan as he arrived in the historic city of Jaipur.
President Macron is the Chief Guest at the 75th Republic Day… pic.twitter.com/voJ6v6KKGl
— Randhir Jaiswal (@MEAIndia) January 25, 2024

हेही वाचा

पुढच्या २५ वर्षांत तरुणाईला स्वतःचे आणि देशाचे भविष्य ठरवावं लागेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Secrets of The Buddha Relics : डिस्कव्हरीवर पाहता येणार ‘सीक्रेटस ऑफ द बुद्धा रेलिक्स’
Republic Day Award: गडचिरोली पोलिस दलातील १८ अधिकारी व जवानांना शौर्य पदकं जाहीर

Latest Marathi News फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन भारतात पोहोचले; जयपूरमध्ये राजस्थानी शैलीत स्वागत Brought to You By : Bharat Live News Media.