‘आदित्य L1’ ला मोठे यश, मॅग्नेटोमीटर बूम L1 पॉईंटवर तैनात

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय सौरमोहिम आदित्य L1 मोहिमेला आणखी एक यश मिळाले आहे. शनिवार ६ जानेवारीला ‘आदित्य L1’ ने पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असलेल्या हॅलो ऑरबिटमध्ये यशस्वीरित्या प्रवेश केला. यानंतर ते लॅग्रेंज पॉईंट L1 वर स्थिर झाले. त्यानंतर आदित्य L1 संदर्भात इस्रोने पुन्हा एकदा अपडेट दिली आहे. इस्रोने म्हटले आहे की, आदित्य L1 मधील ६ … The post ‘आदित्य L1’ ला मोठे यश, मॅग्नेटोमीटर बूम L1 पॉईंटवर तैनात appeared first on पुढारी.
‘आदित्य L1’ ला मोठे यश, मॅग्नेटोमीटर बूम L1 पॉईंटवर तैनात

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: भारतीय सौरमोहिम आदित्य L1 मोहिमेला आणखी एक यश मिळाले आहे. शनिवार ६ जानेवारीला ‘आदित्य L1’ ने पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असलेल्या हॅलो ऑरबिटमध्ये यशस्वीरित्या प्रवेश केला. यानंतर ते लॅग्रेंज पॉईंट L1 वर स्थिर झाले. त्यानंतर आदित्य L1 संदर्भात इस्रोने पुन्हा एकदा अपडेट दिली आहे.
इस्रोने म्हटले आहे की, आदित्य L1 मधील ६ मीटर मॅग्नेटोमीटर बूम हॅलो कक्षामधील लॅग्रेंज पॉइंट-1 वर यशस्वीरित्या तैनात करण्यात आला आहे. आदित्य L1 प्रक्षेपणानंतर १३२ दिवसांनी ही प्रक्रिया पार पडली आहे. या बूममध्ये दोन फ्लक्सगेट मॅग्नेटोमीटर आहेत जे अंतराळातील आंतरग्रहीय चुंबकीय क्षेत्र मोजतात, असे देखील इस्रोने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
आदित्य-L1 मधील मॅग्नेटोमीटर बूम काय करणार
मॅग्नेटोमीटर बूम हा आदित्य-L1 मोहिमेचा एक महत्त्वाचा घटक आहे, ज्याचा उद्देश सूर्याचे क्रोमोस्फियर आणि कोरोना तसेच आंतरग्रहीय चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करणे आहे. बूममध्ये दोन प्रगत फ्लक्सगेट मॅग्नेटोमीटर सेन्सर आहेत जे अंतराळातील कमी-तीव्रतेचे चुंबकीय क्षेत्र मोजण्यासाठी आवश्यक आहेत. अंतराळयानाच्या स्वतःच्या चुंबकीय क्षेत्राचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी हे सेन्सर अवकाशयानाच्या मुख्य भागापासून 3 आणि 6 मीटरच्या अंतरावर रणनीतिकदृष्ट्या ठेवलेले आहेत.

Aditya-L1 Mission:
The 6m magnetometer boom, previously stowed for 132 days, is now successfully deployed in the Halo orbit.
The boom houses two fluxgate magnetometers that measure the interplanetary magnetic field in space.
Details: https://t.co/ZrSKAVu1z4 pic.twitter.com/Xq4LmwBhwE
— ISRO (@isro) January 25, 2024

हेही वाचा:

PM Modi On Aditya-L1 Mission: ‘आदित्य एल-१’ ची ऐतिहासिक झेप! PM मोदींकडून इस्रो शास्त्रज्ञांचे विशेष अभिनंदन
Aditya-L1 Mission Updates | आदित्य L1 बाबत मोठी अपडेट; लवकरच पोहचणार ‘लॅगरेंज पॉईंट L1’वर, इस्रो अध्यक्षांची माहिती
Aditya-L1 Mission | सूर्ययान ‘आदित्य-L1’ ‘यावेळी’ पोहचणार ‘लॅगरेंज पॉईंट१’ (L1) वर; ISRO प्रमुख एस सोमनाथ

Latest Marathi News ‘आदित्य L1’ ला मोठे यश, मॅग्नेटोमीटर बूम L1 पॉईंटवर तैनात Brought to You By : Bharat Live News Media.