गडचिरोली पोलिस दलातील १८ अधिकारी, जवानांना शौर्य पदकं

गडचिरोली;पुढारी वृत्तसेवा: नक्षल्यांविरोधात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गडचिरोली पोलिस दलातील १८ पोलिसअधिकारी व जवानांना शौर्य पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी एक पदक जाहीर झाले आहे. देशातील विविध ठिकाणच्या पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व जवानांना प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध पदके देण्यात येतात. यात राज्यातून गडचिरोलीतील सर्वाधिक जवानांचा समावेश आहे. (Republic Day Award) गडचिरोली पोलिस दलाने चोख कर्तव्य … The post गडचिरोली पोलिस दलातील १८ अधिकारी, जवानांना शौर्य पदकं appeared first on पुढारी.

गडचिरोली पोलिस दलातील १८ अधिकारी, जवानांना शौर्य पदकं

गडचिरोली;Bharat Live News Media वृत्तसेवा: नक्षल्यांविरोधात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गडचिरोली पोलिस दलातील १८ पोलिसअधिकारी व जवानांना शौर्य पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी एक पदक जाहीर झाले आहे. देशातील विविध ठिकाणच्या पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व जवानांना प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध पदके देण्यात येतात. यात राज्यातून गडचिरोलीतील सर्वाधिक जवानांचा समावेश आहे. (Republic Day Award)
गडचिरोली पोलिस दलाने चोख कर्तव्य बजावल्याने मागील काही वर्षांत नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. या कामगिरीत आपले योगदान देणाऱ्या १८ पोलिस अधिकारी व जवानांना यंदा शौर्यपदक जाहीर झाले आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून प्रसिद्ध यादीत गडचिरोलीचे तत्कालिन अपर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे (सध्या पोलिस अधीक्षक लातूर), उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी (करवीर,जि.कोल्हापूर), पोलिस नाईक कमलेश नैताम, शंकर बच्चलवार, मुंशी मडावी, शिपाई सूरज चुधरी, हवालदार मोहन उसेंडी, पोलिस नाईक देवेंद्र आत्राम, संजय वाच्छामी, विनोद मडावी, गुरूदेव धुर्वे, दुर्गेश मेश्राम, शिपाई हिराजी नेवारे, ज्योतीराम वेलादी, पोलिस नाईक माधव मडावी, जीवन नरोटे, शिपाई विजय वडेटवार व कैलास गेडाम यांचा समावेश आहे. (Republic Day Award)
तसेच सहायक फौजदार देवाजी कोवासे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे. पदक प्राप्त अधिकारी व जवानांचे गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी अभिनंदन केले आहे. (Republic Day Award)
Latest Marathi News गडचिरोली पोलिस दलातील १८ अधिकारी, जवानांना शौर्य पदकं Brought to You By : Bharat Live News Media.