मराठा समाज सर्वेक्षण : शिपाई आणि बिगारीही करताहेत सर्वेक्षण

नगर : पुढारी वृत्तसेवा :  राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला महापालिकेच्या हद्दीत सुरुवात करण्यात आली असली, तरी सर्व्हर डाऊन, पाठोपाठ कर्मचार्‍यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. महापालिकेच्या शिपाई, बिगारी अशा चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. त्या कर्मचार्‍यांकडे स्मार्ट फोन नाही, त्यांना इंग्रजी वाचता येत नसल्याने सर्वेक्षणात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. … The post मराठा समाज सर्वेक्षण : शिपाई आणि बिगारीही करताहेत सर्वेक्षण appeared first on पुढारी.

मराठा समाज सर्वेक्षण : शिपाई आणि बिगारीही करताहेत सर्वेक्षण

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा :  राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला महापालिकेच्या हद्दीत सुरुवात करण्यात आली असली, तरी सर्व्हर डाऊन, पाठोपाठ कर्मचार्‍यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. महापालिकेच्या शिपाई, बिगारी अशा चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. त्या कर्मचार्‍यांकडे स्मार्ट फोन नाही, त्यांना इंग्रजी वाचता येत नसल्याने सर्वेक्षणात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे सर्वेक्षण कसे पूर्ण करणार, असा सवाल कर्मचार्‍यांनी उपस्थित केला आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे सर्वेक्षण सुरू केले आहे.
23 ते 31 जानेवारीपर्यंत घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सर्वेक्षणासाठी नेमलेले प्रगणक, पर्यवेक्षकांना बुधवारी महापालिकेत प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. यावेळी मनपा कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सर्वेक्षणाच्या कामातून चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्‍यांना वगळण्याची मागणी केली. सर्र्वेेक्षणासाठी मनपाने खासगी शिक्षकांसह मनपाच्या कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. त्यात शिपाई, बिगारी अशा कर्मचार्‍यांचीही नियुक्ती केल्याने सर्वेक्षणात अडथळे निर्माण होत आहेत. मंगळवारी प्रगणकांनी काम सुरू केल्यानंतर सर्व्हर डाऊन होते. बुधवारीही अनेकांना तीच समस्या सतावत होती. दरम्यान दोन-तीन कर्मचार्‍यांबाबत असे घडले होते. त्यांच्या जागेवर दुसरे कर्मचारी देण्यात आले असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
सर्वेक्षण करताना चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्‍यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे सर्वेक्षणाच्या कामातून त्यांना वगळण्यात यावे, अशी मागणी आस्थापना प्रमुखांकडे केली आहे.
– अनंत लोखंडे, अध्यक्ष, मनपा कामगार संघटना
मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीसाठी जिल्हाभरात दुसर्‍या दिवशीही सर्वेक्षण सुरु होते. दोन दिवसांत जवळपास 2 लाख 76 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. दरम्यान, सर्वेक्षण करणार्‍या प्रगणक आणि पर्यवेक्षकाला प्रत्येकी 10 हजार रुपये मानधन मिळणार आहे. मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मंगळवारपासून 10 हजार 300 प्रगणकांच्या वतीने सर्वेक्षण सुरु झाले आहे. या सर्वेक्षणासाठी पुणे येथील गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र इन्स्टिट्यूटच्या मोबाईल अ‍ॅपव्दारे माहिती गोळा केली जात आहे. मात्र, सर्व्हर जाम होत असल्यामुळे मोबाईल अ‍ॅप सुरु होण्यास विलंब होत आहे.
अशा परिस्थितीतही महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाच्या डॅशबोर्डवर जिल्ह्यातील 2 लाख 76 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण झाल्याची नोंद आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रगणकांकडून सर्वेक्षणाचा तंतोतंत आकडा घेण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. या कामापोटी राज्य मागास वर्ग आयोगाकडून मानधन दिले जाणार आहे. प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. याशिवाय प्रशिक्षणापोटी 500 रुपये मिळणार आहेत. अधिकार्‍यांना मात्र एका महिन्याच्या मूळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम अदा केली जाणार आहे.
Latest Marathi News मराठा समाज सर्वेक्षण : शिपाई आणि बिगारीही करताहेत सर्वेक्षण Brought to You By : Bharat Live News Media.