समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सला अपघात; तिघांचा मृत्यू

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावर आज (दि.२५) पहाटे अपघात झाला. यात तीन जणांचा मृत्यू झाला. चालकाला झोपेची डुलकी आल्याने बस बाजूच्या कंटेनरला धडकल्याची माहिती मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही घटना घडली. ही बस महेंद्र ट्रॅव्हल्सची असून ती नागपुररमार्गे अहमदनगरहून रायपूरकडे जात होती. अमरावती जिल्ह्यातील वाढोना शिवणी दरम्यान चॅनल १२८ … The post समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सला अपघात; तिघांचा मृत्यू appeared first on पुढारी.

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सला अपघात; तिघांचा मृत्यू

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावर आज (दि.२५) पहाटे अपघात झाला. यात तीन जणांचा मृत्यू झाला. चालकाला झोपेची डुलकी आल्याने बस बाजूच्या कंटेनरला धडकल्याची माहिती मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही घटना घडली. ही बस महेंद्र ट्रॅव्हल्सची असून ती नागपुररमार्गे अहमदनगरहून रायपूरकडे जात होती.
अमरावती जिल्ह्यातील वाढोना शिवणी दरम्यान चॅनल १२८ वर हा अपघात झाला आहे. यात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतकांची नावे मिळू शकली नाहीत. अपघात होताच चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. या संदर्भात अधिक तपास तळेगाव दशासर पोलीस करीत आहेत.
Latest Marathi News समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सला अपघात; तिघांचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.