कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर भाजपमध्ये परतणार, अमित शहांची घेतली भेट

Bharat Live News Media ऑनलाईन : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर भाजपमध्ये परतण्याची शक्यता आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जगदीश शेट्टर यांनी यांना भाजपची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता ते भाजपमध्ये परतणार आहेत. (Karnataka Politics)
कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जगदीश शेट्टर यांनी भाजपचे आमदार म्हणून राजीनामा दिला होता. जवळपास तीन दशकांपासून ते भाजपशी जोडले गेले होते. पण तिकीट नाकारल्यानंतर ते भाजपची साथ सोडत काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यांना राज्यात मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. काँग्रेसने नंतर त्यांना एक प्रमुख महामंडळ देण्याचे आश्वसन दिले होते. पण सरकारी महामंडळे आणि मंडळांवर राजकीय नियुक्तींना विलंब होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेट्टर भाजपमध्ये परतणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
शेट्टर लिंगायत समाजातील प्रमुख नेते आहेत. कर्नाटकात २०१८ मध्ये लिंगायत व्होटबँक असलेल्या ७० पैकी ३८ जागा जिंकून भाजपने वर्चस्व निर्माण केले होते.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी बुधवारी सांगितले की, भाजप लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना पुन्हा पक्षात घेण्याचा प्रयत्न करत आहे. यातून भाजप-जेडीएस युतीकडे “नेतृत्वाची आणि आत्मविश्वासाची गंभीर उणीव” असल्याचे दिसते.
म्हैसूरमधील पेरियापटना येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना डी. के. शिवकुमार म्हणाले की, भाजपच्या अनेक नेत्यांनी शेट्टर यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या वापसीसाठी मनधरणी केली आहे. यातून भाजप आणि जेडीएसमधील नेतृत्व कमकुवत झाल्याचे दिसते, असा दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शेट्टर पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याचा अफवा फेटाळून लावल्या आहेत. “शेट्टर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ते भाजपमध्ये परतणार नाहीत. असे असूनही भाजप त्यांच्याबाबत अफवा पसरवत आहे.”
Former Karnataka CM Jagadish Shettar likely to come back to the BJP. He has met Union Home Minister and senior party leader Amit Shah: Sources
He had quit BJP and joined Congress in April last year.
(File photo) pic.twitter.com/nfvoTjANIy
— ANI (@ANI) January 25, 2024
Latest Marathi News कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर भाजपमध्ये परतणार, अमित शहांची घेतली भेट Brought to You By : Bharat Live News Media.
