धाराशिव : अज्ञात वाहनाची मोटरसायकलला धडक; दोघांचा मृत्यू
उमरगा; पुढारी वृत्तसेवा : अज्ञात भरधाव वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. सोलापूर – हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाजवळ रविवारी (दि.१९) रात्री साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. दोघेही मृत मुरुम (ता.उमरगा जि. धाराशिव) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, मुरुम बाजार समितीचे प्रभारी सचिव अण्णाराव कल्याणी कुंभार (वय ५६) व सुग्रीव श्रीरंग पाटील (वय ५७) हे दोघे उमरगा येथून काम आटोपून मुरुमकडे जात असताना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात अण्णाराव कुंभार यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुग्रीव पाटील यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हेही वाचा :
चंद्रपूर : अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा वर्धा नदीपात्रात बुडून मृत्यू
Nagar Crime News : पत्नीचा खून करुन पतीने मृतदेह पुरला
Nagpur News: कातलाबोडी येथील गोपालकाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू: अनिल देशमुखांची जंगलात ५ किमी पायपीट
The post धाराशिव : अज्ञात वाहनाची मोटरसायकलला धडक; दोघांचा मृत्यू appeared first on पुढारी.
उमरगा; पुढारी वृत्तसेवा : अज्ञात भरधाव वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. सोलापूर – हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाजवळ रविवारी (दि.१९) रात्री साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. दोघेही मृत मुरुम (ता.उमरगा जि. धाराशिव) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, मुरुम बाजार समितीचे प्रभारी सचिव अण्णाराव कल्याणी कुंभार (वय ५६) …
The post धाराशिव : अज्ञात वाहनाची मोटरसायकलला धडक; दोघांचा मृत्यू appeared first on पुढारी.