पराभवानंतर विराट भावूक अश्रू झाले अनावर; अनुष्काने मिठी मारुन सावरलं
पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ विकेट्सने पराभव केला. भारताचे स्वप्नभंग करत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. टीम इंडियाचे २४१ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने सहजरित्या गाठले. दरम्यान, भारताच्या हातातोंडाशी आलेला खास ऑस्ट्रेलियाने हेरावून घेतल्याने टीम इंडियातील अनेक खेळाडूंना अश्रू अनावर झाले. कर्णधार रोहित शर्मी आणि विराट कोहली हे भर मैदानात भावनिक झालेले पाहायला मिळाले. (Virat-Anushka)
पराभवानंतर विराट भावूक अश्रू झाले अनावर; अनुष्काने मिठी मारून सावरलं (Virat-Anushka)
ऑस्ट्रेलियाने पराभव केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा अश्रू अनावर झाल्याने मैदानाच्या बाहेर निघून गेला. भारताच्या सर्व खेळाडूंना अश्रू अनावर झाले. यावेळी विराट कोहली भावनिक झाला होता. त्याला पत्नी अनुष्काने मिठी मारत सावरण्याचा प्रयत्न केला. विराट-अनुष्काचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (Virat-Anushka)
पॅट कमिंसने शब्द खरा करुन दाखवला; भारतीय प्रेक्षकांमध्ये पिनड्रॉप सायलेंस
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंसने पत्रकार परिषदेत दिलेल्या शब्द खरा करुन दाखवला आहे. भारतीय प्रेक्षकांनी मैदान तुडुंब भरलेले असेल आम्ही सर्व प्रेक्षकांना शांत करुन दाखवू, असे पॅट कमिंस म्हणाला होता. त्याचा हा शब्द त्याने सत्यात उतरवला आहे. विश्वचषकावर सहाव्यांदा मोहर उमटवत त्याने भारतीय प्रेक्षकांमध्ये पिन ड्रॉप सायलेंस केला होता.
काय म्हणाला होता पॅट कमिंस? (Pat Cummins)
ऑस्ट्रेलियन संघासमोर कोणत्या भारतीय खेळाडूचे आव्हान असेल, या प्रश्नाला उत्तर देताना कमिन्स म्हणतो, “भारत हा एक चांगला संघ आहे. मोहम्मद शमी हा मोठा (धोका) आहे.” क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्याच्या खेळपट्टीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कमिन्सने म्हटले की, “दोन्ही संघांसाठी हे स्पष्टपणे सारखेच आहे. आपल्याच देशात खेळण्याचे काही फायदे आहेत यात शंका नाही. पण आम्ही इथे खूप क्रिकेट खेळलो आहोत.” (Pat Cummins) (Virat-Anushka)
हेही वाचलंत का?
Pat Cummins : पॅट कमिंसने शब्द खरा करुन दाखवला; भारतीय प्रेक्षकांमध्ये पिनड्रॉप सायलेंस
Bhogavati sugar factory election : भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी चुरशीने ८६. २६ टक्के मतदान; सोमवारी मतमोजणी
The post पराभवानंतर विराट भावूक अश्रू झाले अनावर; अनुष्काने मिठी मारुन सावरलं appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ विकेट्सने पराभव केला. भारताचे स्वप्नभंग करत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. टीम इंडियाचे २४१ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने सहजरित्या गाठले. दरम्यान, भारताच्या हातातोंडाशी आलेला खास ऑस्ट्रेलियाने हेरावून घेतल्याने टीम इंडियातील अनेक खेळाडूंना अश्रू अनावर झाले. कर्णधार रोहित शर्मी आणि विराट कोहली हे भर मैदानात भावनिक …
The post पराभवानंतर विराट भावूक अश्रू झाले अनावर; अनुष्काने मिठी मारुन सावरलं appeared first on पुढारी.