Nashik I उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक वाढण्याची शक्यता; निफाड 4.4

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवत आहे. पाऱ्यातील घसरणीमुळे निफाडला ४.४ अंश सेल्सियस तापमान आल्याने निफाडकरांना अशरक्ष: हुडहुडी भरली आहे. तर नाशिकमध्ये ८.६ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले आहे.  (North Maharashtra Cold) महाराष्ट्रात त्यातही विशेष करून उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर अधिक जाणवत आहे. द्राक्षपंढरी असलेल्या … The post Nashik I उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक वाढण्याची शक्यता; निफाड 4.4 appeared first on पुढारी.

Nashik I उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक वाढण्याची शक्यता; निफाड 4.4

नाशिक : Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क
उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवत आहे. पाऱ्यातील घसरणीमुळे निफाडला ४.४ अंश सेल्सियस तापमान आल्याने निफाडकरांना अशरक्ष: हुडहुडी भरली आहे. तर नाशिकमध्ये ८.६ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले आहे.  (North Maharashtra Cold)
महाराष्ट्रात त्यातही विशेष करून उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर अधिक जाणवत आहे. द्राक्षपंढरी असलेल्या निफाडला यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी ४.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे अवघ्या तालुक्यात थंडीची लाट पसरली असून द्राक्षमणी फुटण्याची शक्यता वाढल्याने शेतक-यांनी द्राक्षबागेत शेकोट्या पेटवल्या असून काहींनी द्राक्षांना कापड गुंडाळले आहे. शक्य तशा पध्दतीने शेतकरी द्राक्ष बाग वाचवण्याच्या धडपडीत दिसून येत आहे. त्यामुळे थंडीच्या कडाक्यात शेतक-यांची ससेहोलपट मात्र होत आहे. पहाटे पडणाऱ्या दवबिंदूमुळे द्राक्षबागांना धोका वाढल्याने शेतकरी चिंतातुर झालेला दिसत आहे. (North Maharashtra Cold)
हेही वाचा:

हजारोंची गर्दी आणि अदम्य उत्साह ! पाहा मराठा मोर्चाचे खास फोटो
IND vs ENG 1st Test | भारत-इंग्लंड पहिली कसोटी सुरु, इंग्लंडची पहिल्यांदा फलंदाजी, अशी आहे भारताची प्लेईंग ११
हुडहुडी वाढली ! राज्यात थंडीची लाट ; सर्वात कमी तापमान नाशिकमध्ये

Latest Marathi News Nashik I उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक वाढण्याची शक्यता; निफाड 4.4 Brought to You By : Bharat Live News Media.