खासदार राहुल शेवाळे यांना मातृशोक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांच्या मातोश्री जयश्री रमेश शेवाळे यांचे आज रविवारी (दि.१९) सायंकाळी ८ वाजता मानखुर्द येथील राहत्या घरी निधन झाले. त्या ७३ वर्षाच्या होत्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्यांना गुरुवारी (दि.१६) डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्या घरीच … The post खासदार राहुल शेवाळे यांना मातृशोक appeared first on पुढारी.

खासदार राहुल शेवाळे यांना मातृशोक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांच्या मातोश्री जयश्री रमेश शेवाळे यांचे आज रविवारी (दि.१९) सायंकाळी ८ वाजता मानखुर्द येथील राहत्या घरी निधन झाले. त्या ७३ वर्षाच्या होत्या.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्यांना गुरुवारी (दि.१६) डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्या घरीच होत्या. मात्र, आज सायंकाळी राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तातडीने त्यांना चेंबूरच्या साई रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात अविनाश शेवाळे, नवीन शेवाळे आणि खासदार राहुल शेवाळे अशी तीन मुले, सौ. वर्षा अविनाश शेवाळे, माजी नगरसेविका सौ. वैशाली नवीन शेवाळे, माजी नगरसेविका सौ. कामिनी राहुल शेवाळे या तीन सूना आणि एकूण ६ नातवंडे असा परिवार आहे. सोमवार (दि.२०) दुपारी १२ वाजता ट्रॉम्बे कोळीवाडा येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
हेही वाचा : 

उत्तराखंडमधील मजुरांना बाहेर काढण्यासाठी आणखी चार दिवसांचा कालावधी : नितीन गडकरी
Rajasthan : राजस्थानमध्‍ये अपघातात PM मोदींच्या निवडणूक रॅलीतील ६ पाेलीस कर्मचारी ठार
कोल्‍हापूर : घोटवडे मतदान केंद्राजवळ करणीचा प्रकार; नारळ, बाहुली, चप्पल अन् हळदी कुंकू आढळले

The post खासदार राहुल शेवाळे यांना मातृशोक appeared first on पुढारी.

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांच्या मातोश्री जयश्री रमेश शेवाळे यांचे आज रविवारी (दि.१९) सायंकाळी ८ वाजता मानखुर्द येथील राहत्या घरी निधन झाले. त्या ७३ वर्षाच्या होत्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्यांना गुरुवारी (दि.१६) डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्या घरीच …

The post खासदार राहुल शेवाळे यांना मातृशोक appeared first on पुढारी.

Go to Source