कोल्हापूर : रुईकर कॉलनीत साडेतीन लाखांचे दागिने चोरणार्या तिघांना अटक

कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : रुईकर कॉलनी येथील पृथ्वीराज धैर्यशील पाटील यांच्याकडे घरकाम करणार्या रोहित महेश सावंत (वय 23, रा. सदर बाजार) याने मित्रांच्या साथीने पाटील यांच्याच घरातील सुमारे साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचा प्रकार शाहूपुरी पोलिसांनी उघडकीस आणला.
याप्रकरणी रोहितचे मित्र रोहन अरुण कांबळे (वय 20, रा. विचारे माळ), जस्सी सुधीर चांदणे (वय 23, रा. जुना बुधवार) यांनाही पोलिसांनी अटक केली. लोकांची देणी भागविण्यासाठी ही चोरी केल्याची कबुली संशयितांनी दिली. रुईकर कॉलनी येथे आर्किटेक पृथ्वीराज पाटील यांच्या बंगल्यात रोहित सावंत हा घरकाम करत होता. पाटील यांच्या बंगल्यात काही दिवसांपूर्वी चोरी झाली. या चोरीमध्ये 3 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज या तिघांनी लंपास केला होता. यापैकी रोहित सावंत हा पाटील यांच्या घरात घरकाम करण्यासोबत सर्व्हिसिंग सेंटरमध्येही काम करतो. तेथेच रोहन कांबळे व जस्सी चांदणे यांची ओळख झाली होती. या तिघांनी ही चोरी केली आहे. पोलिसांनी त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली. त्यानंतर आता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
Latest Marathi News कोल्हापूर : रुईकर कॉलनीत साडेतीन लाखांचे दागिने चोरणार्या तिघांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.
