चिंचली मायाक्का देवीची यात्रा २४ फेब्रुवारी ते ३ मार्चअखेर

जयसिंगपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचली (ता. रायबाग, जि. बेळगाव) येथील श्री मायाक्का (माकुबाई) देवीची यात्रा (शनिवार दि. 24 फेब्रुवारी ते रविवार दि. 3 मार्च) अखेर होणार असल्याची माहिती श्री मायाक्का देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
या यात्रेत सुमारे 4 ते 5 लाख भाविक उपस्थित राहणार असल्याने कुडची, रायबाग पोलिस व देवस्थान समितीने यात्रेसाठी नियोजन सुरू केले आहे. बुधवार दि.28 फेब्रुवारी रोजी महानैवेद्य बोनी व पालखी सोहळा होणार आहे. यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात स्टॉल असतात. भंडारा व खोबरे यांची हजारो टनाची उधळण होत असते. ही यात्रा रविवार (दि.3) मार्चअखेर भरणार आहे. सौंदत्ती श्री रेणुकादेवी यात्रेला गेलेले सर्व भाविक या यात्रेत सहभागी होतात.
Latest Marathi News चिंचली मायाक्का देवीची यात्रा २४ फेब्रुवारी ते ३ मार्चअखेर Brought to You By : Bharat Live News Media.
