प्रजासत्ताक दिनी महाडच्या माहेरवाशिणींकडून राजहंस गडावर होणार ध्वजारोहण

महाड : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून बेळगाव येथे राहणाऱ्या आणि महाडच्या माहेरवाशीणींकडून बेळगावजवळील राजहंस गडावर शुक्रवारी (दि.२६) राष्ट्रध्वजाबरोबर भगवा ध्वज फडकविला जाणार आहे. Republic Day शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचे तथा हिंदवी स्वराज्याचे हे ३५० वे वर्ष चालू आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रातील सर्व गिर्यारोहण संघटनांची शिखर संस्था असलेली … The post प्रजासत्ताक दिनी महाडच्या माहेरवाशिणींकडून राजहंस गडावर होणार ध्वजारोहण appeared first on पुढारी.

प्रजासत्ताक दिनी महाडच्या माहेरवाशिणींकडून राजहंस गडावर होणार ध्वजारोहण

श्रीकृष्ण द बाळ

महाड : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून बेळगाव येथे राहणाऱ्या आणि महाडच्या माहेरवाशीणींकडून बेळगावजवळील राजहंस गडावर शुक्रवारी (दि.२६) राष्ट्रध्वजाबरोबर भगवा ध्वज फडकविला जाणार आहे. Republic Day
शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचे तथा हिंदवी स्वराज्याचे हे ३५० वे वर्ष चालू आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रातील सर्व गिर्यारोहण संघटनांची शिखर संस्था असलेली अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीरोजी महाराष्ट्र तसेच  कर्नाटकातील काही किल्ले मिळून असे एकूण ३५० किल्ल्यांवर एकाच दिवशी तिरंगा आणि भगवा ध्वज फडकवण्याचा संकल्प सोडला आहे.
त्या अंतर्गत कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील राजहंसगडावर संस्कृती ग्रुप बेळगाव यांच्यामार्फत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये सर्व महिला सामील होणार असून विशेष म्हणजे ज्यांचे “माहेर” महाड आहे, अशा महिला यामध्ये सहभागी होणार आहेत. या मोहिमेचे नेतृत्व महाडमधील प्रसिद्ध व्यावसायिक “अमर एंटरप्राइजेस “चे मालक बिपिन तलाठी यांची बहीण बीना तलाठी करणार आहेत. यामध्ये महाडच्या पूर्वाश्रमीच्या सारिका अशोक संसारे, ज्योत्स्ना प्रतापराव भोसले व पद्मिनी नगरकर या महिला सहभागी होणार आहेत. परकीय गुलामगिरीतून आपल्या मनगटाच्या जोरावर या भूमीला मुक्त करणाऱ्या पुण्यश्लोक श्री छत्रपती  शिवाजी महाराजांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहिली जाणार आहे.
हेही वाचा 

रायगड: पनवेलमध्ये रॅलीत झालेल्या हल्ल्यात दोन युवक गंभीर जखमी
रायगड : कुणबी म्हणून नको मराठा म्हणून आरक्षण मिळावे; क्षत्रिय मराठा समाजाची मागणी
राजन साळवी यांची पुन्हा रायगड एसीबी कार्यालयात चौकशी

Latest Marathi News प्रजासत्ताक दिनी महाडच्या माहेरवाशिणींकडून राजहंस गडावर होणार ध्वजारोहण Brought to You By : Bharat Live News Media.