बीड : शिरूरच्या व्यापाऱ्याचा अपघातात मृत्यू

शिरूर कासार : Bharat Live News Media वृत्तसेवा : नगर जिल्ह्यातील भाळवणीजवळ झालेल्या बस, ट्रॅक्टर व चारचाकी वाहनाच्या तिहेरी अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये सचिन मंडलेचा (वय ३५, मूळ रा. टाकळी मानूर, सध्या रा. शिरूर ) या व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी मुंबईवरून माल खरेदी करून सचिन परत येत होते. यावेळी झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत आणखी दोघे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर नगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सचिन मंडलेचा यांच्या पश्चात दोन जुळ्या मुली, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूवर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
बीड : भेडबुद्रुक येथे टेम्पोखाली सापडून एक ठार; तीन जखमी
जालना: मराठा आंदोलक शहागडमार्गे बीड जिल्ह्यात प्रवेश करणार; पोलीस बंदोबस्त तैनात
बीड: मराठा आंदोलकांसाठी कोळगावसह ५० गावे अन्नदानासाठी सज्ज
Latest Marathi News बीड : शिरूरच्या व्यापाऱ्याचा अपघातात मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
