आक्षेपार्ह पोस्टमुळे नांदगाव कडकडीत बंद, युवकाला अटक

नांदगाव – नांदगाव शहरात काही समाजकंटकांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने नांदगाव शहरात व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी संबंधित युवकाला तात्काळ अटक केली असून, दरम्यान या पोस्टमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच यामुळे नांदगाव बंदची हाक दिली होती.
सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्ट मुळे शहरात बुधवार (दि. 24) रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला शहरातील छोट्या – मोठ्या व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला होता. यामुळे नांदगाव शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. शहरातील चौका – चौकातील फलकावर घटनेचा निषेध करून, आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी सकल हिंदू समाजाने केली.
शहरातील काही समाजकंटकांनी इंस्टाग्राम अकाऊंटवर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे शहरात रात्री काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी सकाळी नांदगाव पोलीस स्टेशन समोर शहरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी पोलीस उपाधीक्षक अविनाश भारती यांनी जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले.
यावेळी संबंधितांवर संजय सानप यांच्या माध्यमातून नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. शहरातील सकल हिंदू समाजाने आज नांदगाव बंदची हाक देवून दुपारी सकल हिंदू समाजातर्फे अप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती मालेगाव, प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे, उपविभागीय अधिकारी सोहेल शेख तसेच पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन दिल्यानंतर सकल हिंदू समाज आणि पोलिसांनी शहरातील व्यापाऱ्यांना आपली दुकाने पुर्ववत सुरू करण्याचे आवाहन केले. दुपारी चार वाजेनंतर शहरातील दुकाने उघडण्यात आली. शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सदरील घटनेचा तपास एपीआय नितीन खंडाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष बहाकर करीत आहे.
हेही वाचा :
Dhule News : किरकोळ कारणावरून एकाला जिवंत जाळणाऱ्या तरुणाला जन्मठेप
Divyah Khosla Kumar : ‘हिरो हिरोईन’चं पहिलं पोस्टर रिलीज; दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत
Jalgaon News : वीज कामगार महासंघाचे प्रजासत्ताकदिनी धरणे आंदोलन
Latest Marathi News आक्षेपार्ह पोस्टमुळे नांदगाव कडकडीत बंद, युवकाला अटक Brought to You By : Bharat Live News Media.
