संजय भन्साळी नव्या चित्रपटाच्या तयारीत; आलिया-रणबीरची मॉडर्न लव्ह स्टोरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘गंगूबाई काठियावाडी’ नंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी लवकरच मॉडर्न लव्ह स्टोरीवर आदारित नवीन चित्रपट घेवून येत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘लव्ह अॅन्ड वॉर’ ( LOVE and WAR ) असे आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यानंतर पुन्हा एकदा आलिया भट्ट, रणबीरच्या … The post संजय भन्साळी नव्या चित्रपटाच्या तयारीत; आलिया-रणबीरची मॉडर्न लव्ह स्टोरी appeared first on पुढारी.

संजय भन्साळी नव्या चित्रपटाच्या तयारीत; आलिया-रणबीरची मॉडर्न लव्ह स्टोरी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘गंगूबाई काठियावाडी’ नंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी लवकरच मॉडर्न लव्ह स्टोरीवर आदारित नवीन चित्रपट घेवून येत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘लव्ह अॅन्ड वॉर’ ( LOVE and WAR ) असे आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यानंतर पुन्हा एकदा आलिया भट्ट, रणबीरच्या जोडीला पडद्यावर पाहम्यास चाहते उत्सुक झाले आहेत.
संबंधित बातम्या 

Divyah Khosla Kumar : ‘हिरो हिरोईन’चं पहिलं पोस्टर रिलीज; दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत
Priyanka Chopra : प्रियांकाचा मन्नाराला सपोर्ट; बिग बॉस १७ च्या ग्रॅड फिनालेच्या आधीच खास संदेश
Bade Miyan Chote Miyan : महाप्रलय येतोय…; अक्षय-टायगरच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चा टिझर रिलीज (video)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊटवर आगामी ‘लव्ह अॅन्ड वॉर’ चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटाचे LOVE and WAR नाव ठळक अक्षरात लिहिले आहे. यासिवाय पोस्टरमध्ये दिग्गज स्टार आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांची नावेही त्याच्या सहीसोबत लिहिले आहे. या नावाच्या वरच्या बाजूस निर्माते संजय लीला भन्साळी यांच्याही नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान या पोस्टरवर २०२५ रोजी ख्रिसमसच्या मुहूर्तावर येणार असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे या चित्रपटाच्या कास्टिंगची तयारी जोरदार सुरू झाली आहे. यावरून ‘गंगूबाई काठियावाडी’ नंतर भन्साळी मॉडर्न लव्ह स्टोरीवर आधारित चित्रपट घेवून येत असल्याची माहिती मिळतेय. आलियाला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली असून तिने हा चित्रपट साईन केला आहे. तर रणबीरलाही हा चित्रपट आवडल्याचे स्पष्ट झाले आहे.
आलियाने सोशल मीडियावर या चित्रपटाची माहिती दिली असली तरी अद्याप निर्मात्यांनी या चित्रपटाबद्दलची अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान ‘लव्ह अॅन्ड वॉर’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर कूपच व्हायरल झाले आहे. आतापर्यत या पोस्टरवर अभिनेत्री गौरी कुलकर्णीसह १ लाख १८ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

 

View this post on Instagram

 
A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

 

View this post on Instagram

 
A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

Latest Marathi News संजय भन्साळी नव्या चित्रपटाच्या तयारीत; आलिया-रणबीरची मॉडर्न लव्ह स्टोरी Brought to You By : Bharat Live News Media.