टीम इंडियाचे स्वप्न भंगले; रोहित-विराटसह भारतीय खेळाडूंना अश्रू अनावर

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा ६ विकेट्सने पराभव करत भारताचे स्वप्नभंग केले आहे. कांगारूंनी सहाव्यांदा विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियाने दिलेल्या २४१ धावांच्या आव्हानाचा ऑस्ट्रेलियाने यशस्वीरित्या पाठलाग केला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर भारतीय खेळाडूंना अश्रू अनावर झाले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मैदानावर भावूक झालेला पाहायला मिळाला आहे. ट्रायव्हस हेडची … The post टीम इंडियाचे स्वप्न भंगले; रोहित-विराटसह भारतीय खेळाडूंना अश्रू अनावर appeared first on पुढारी.

टीम इंडियाचे स्वप्न भंगले; रोहित-विराटसह भारतीय खेळाडूंना अश्रू अनावर

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा ६ विकेट्सने पराभव करत भारताचे स्वप्नभंग केले आहे. कांगारूंनी सहाव्यांदा विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियाने दिलेल्या २४१ धावांच्या आव्हानाचा ऑस्ट्रेलियाने यशस्वीरित्या पाठलाग केला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर भारतीय खेळाडूंना अश्रू अनावर झाले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मैदानावर भावूक झालेला पाहायला मिळाला आहे. ट्रायव्हस हेडची शतकी खेळी आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. (World Cup 2023 Final)
नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाला २४० धावांमध्ये रोखण्यात यश मिळवले. यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाला ३ धक्के दिले. मात्र, चौथ्या विकेटसाठी ट्रायव्हस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी मोठी भागीदारी रचली आणि भारताला सामन्यातून बाहेर केले.  भारताकडून जसप्रीत बुमराहने ३ तर मोहम्मद शमीने १ विकेट पटकावली. (World Cup 2023 Final)
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ २४० धावांत ऑलआऊट झाला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ आणि विराट कोहलीने ५४ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 47 आणि सूर्यकुमार यादवने 18 धावा केल्या. कुलदीप यादवने 10 धावांचे योगदान दिले. या पाच खेळाडूंशिवाय कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. रवींद्र जडेजा नऊ, मोहम्मद शमी सहा, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल प्रत्येकी चार धावा करून बाद झाले. जसप्रीत बुमराहला एकच धाव करता आली. मोहम्मद सिराज नऊ धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पाने प्रत्येकी एक विकेट घेतली. (World Cup 2023 Final)
भारतासाठी या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी ६७ धावांची सर्वात मोठी भागीदारी केली. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. रोहित, कोहली आणि राहुलला चांगली सुरुवात मोठ्या डावात करता आली नाही. श्रेयस अय्यर, शुभमन गिल, सूर्यकुमार मोठ्या क्षणी अपयशी ठरले. आता संपूर्ण जबाबदारी गोलंदाजांवर आहे. त्याच्याकडून धोकादायक गोलंदाजीची अपेक्षा आहे. (World Cup 2023 Final)
हेही वाचलंत का?

World Cup 2023 Final : भारताचे स्वप्नभंग; ऑस्ट्रेलियाची सहाव्यांदा विश्वचषकावर मोहर
WC 2023 Final Photos : विराटवर अनुष्का नाराज, राहूलची विकेट पाहून अथियाचा चेहरा फिका; पाहा सामन्यात काय झालं?

The post टीम इंडियाचे स्वप्न भंगले; रोहित-विराटसह भारतीय खेळाडूंना अश्रू अनावर appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा ६ विकेट्सने पराभव करत भारताचे स्वप्नभंग केले आहे. कांगारूंनी सहाव्यांदा विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियाने दिलेल्या २४१ धावांच्या आव्हानाचा ऑस्ट्रेलियाने यशस्वीरित्या पाठलाग केला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर भारतीय खेळाडूंना अश्रू अनावर झाले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मैदानावर भावूक झालेला पाहायला मिळाला आहे. ट्रायव्हस हेडची …

The post टीम इंडियाचे स्वप्न भंगले; रोहित-विराटसह भारतीय खेळाडूंना अश्रू अनावर appeared first on पुढारी.

Go to Source