रशियाचे लढाऊ विमान कोसळले; युक्रेनचे ६५ युद्धकैदी ठार झाल्याची भीती

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : युक्रेनमधील युद्धबंधकांना घेऊन जात असलेले रशियाचे लढाऊ विमानाला अपघात झाला आहे. हे विमान कोरोचानस्की जिल्ह्यात कोसळले. या विमानात ६५ युद्धकैदी होते असे सांगण्यात आले आहे. अपघाताचे कारण समजू शकलेले नाही; पण विमानातील सर्व युद्धकैदी आणि इतर कर्मचारी आगीत या अपघातात ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. ( Russian plane crashes )
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या IL – 76 या विमान ६५ युद्धकैदी घेऊन जात असताना हा अपघात झाला आहे. विमान ज्या जिल्ह्यात कोसळले आहे तो जिल्हा बेलगोरॉड या प्रांतात आहे. तेथील राज्यपाल व्याचेस्लाव ग्लाडकोव यांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे.
६५ कैद्यांशिवाय विमानात सहा क्रु मेंबर आणि ३ सहायक यांचाही समावेश आहे, असे बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
Latest Marathi News रशियाचे लढाऊ विमान कोसळले; युक्रेनचे ६५ युद्धकैदी ठार झाल्याची भीती Brought to You By : Bharat Live News Media.
