कोल्हापूर : शाळेत टिपू सुलतानचा फोटो लावल्याने तणाव

शिरोली एमआयडीसी; Bharat Live News Media वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील शाळेत वर्ग सजावटीत महापुरूषांच्या फोटोशेजारी टिपू सुलतानचा फोटो लावल्याने तणाव निर्माण झाला. हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनास धारेवर धरत फोटो लावणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करून त्याला शाळेतून काढून टाकण्याची मागणी केली.
आज (दि.२४) सकाळी गावातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शाळेत धाव घेवून विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाका, असा आग्रह धरला. यास मुख्याध्यापकांनी विरोध केल्याने तणावाचे वातवरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांनी शाळेत बंदोबस्त तैनात केला असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
या शाळेतील शिक्षकांच्या आदेशावरून वर्ग सजावटीसाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांकडून वर्गणी गोळा केली होती. या वर्गणीतून महापुरुषांचे फोटो व अन्य सजावटीचे साहित्य खरेदी केले होते. सजावट करताना महापुरूषांच्या फोटोशेजारी एका विद्यार्थाने टिपू सुलतानचा फोटो लावला होता. हा प्रकार काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शिक्षकांना सांगितल्यावर टिपू सुलतानचा फोटो काढण्यात आला. मात्र, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकण्याच्या मागणीसाठी शाळेतच ठिय्या मारला. त्यामुळे वातावरण तणावपूर्वक बनले. दरम्यान, करवीरचे विभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी आणि गटशिक्षण अधिकारी शाळेत दाखल झाले आहेत.
हेही वाचा
कोल्हापूर : निवडणूक प्रचाराचा हायटेक फंडा
कोल्हापूर : बलात्कारानंतर लुबाडणूक करणार्या नराधमाकडून 7 तोळे दागिने, रोकड जप्त
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात मतदार घटले
Latest Marathi News कोल्हापूर : शाळेत टिपू सुलतानचा फोटो लावल्याने तणाव Brought to You By : Bharat Live News Media.
