जरांगेंनी मान्य केली पुणे पोलिसांची विनंती ; बदलला दिंडीचा मार्ग

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात बीडहून मुंबईकडे निघालेली पायी दिंडी आज सकाळी पुणे शहरात पोहोचली. या दिंडीचे सगळ्या ठिकाणी अतिशय जोरदार स्वागत करण्यात आले. ठीकठिकाणी फुलांची उधळण करून मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. या यात्रेला पुण्यात अलोट गर्दी झाली आहे. यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि गैरसोयीचा विचार करता, पुणे पोलिसांनी जरांगे पाटलांना या दिंडीचा मार्ग बदलण्याची विनंती केली आहे. जरांगे यांनीही ही विनंती मान्य केल्याने दिंडीच्या मार्गात अंशत : बदल करण्यात आला आहे.
नवीन मार्ग खालील प्रमाणे आहे –
येरवडा पर्णकुटी येथून सादल बाबा चौकातून डावीकडे वळून – संगमवाडी- पाटील इस्टेट – संचेती ब्रिज- सिमला ऑफिस -वीर चाफेकर ब्रिज- पुणे विद्यापीठ -औंध मार्ग – राजीव गांधी ब्रिज मार्गे पुढे पिंपरी चिंचवड हद्दीत जाणार आहे..
Latest Marathi News जरांगेंनी मान्य केली पुणे पोलिसांची विनंती ; बदलला दिंडीचा मार्ग Brought to You By : Bharat Live News Media.
