Nagar : वर्षभरात वाढले जिल्ह्यात 43216 मतदार

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्हा निवडणूक विभागाने मंगळवारी जिल्ह्याची 36 लाख 11 हजार 33 मतदारसंख्या असलेली अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षात 43 हजार 216 नवीन मतदारांची भर पडली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ही यादी वापरली जाणार आहे. मतदार नोंदणीची निरंतर प्रक्रिया सुरुच असल्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सांगितले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2014 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यात आला आहे.
या कार्यक्रमात मतदार नोंदणीसाठी एकूण 73 हजार 432 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 68 हजार 940 अर्ज पात्र ठरले असून, 4 हजार 492 अर्ज रहिवासी पुरावा, वयाचा पुरावा नसल्याने रदृ केले आहेत. त्यामुळे 18 ते 19 वयोगटातील 27 हजार 349 तर 20 ते 29 वयोगटातील 34 हजार 654 मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 3 हजार 731 मतदान केंद्रांवर अंतिम मतदारयादी प्रसिध्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 5 जानेवारी 2023 रोजी जिल्ह्याची 35 लाख 67 हजार 817 मतदारसंख्या होती. यंदा मात्र 36 लाख 11 हजार 33 मतदारसंख्या झाली आहे. वर्षभरात 43 हजार 216 मतदारांची वाढ झाली आहे. या पत्रकार परिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, तहसीलदार प्रदीप पाटील, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी व शंकर रोडे हे उपस्थित होते.
69193 मतदारांची वगळणी
1 जानेवारी 2014 पुनरिक्षण कार्यक्रमात 40 हजार 30 मतदारांची वगळणी केली आहे. मतदार यादी बिनचूक करण्यासाठी 21 जुलै 2023 ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या घरोघरी भेटीची मोहीम राबवली. यामधील 80 वर्षांवरील मतदारांची पडताळणी, समान छायाचित्र व समान ठिकाण असलेल्या मतदारांच्या नोंदीची पडताळणी करुन 29 हजार 163 मतदारांची वगळणी केली. एकंदरीत 69 हजार 193 मतदारांची वगळणी केलेली आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारसंख्या
अकोले : 257519, संगमनेर : 275821, शिर्डी : 276072, कोपरगाव : 276791, श्रीरामपूर : 298230, नेवासा : 271666, शेवगाव : 356477, राहुरी : 307632, पारनेर : 337075, अहमदनगर : 294585, श्रीगोंदा : 325032, कर्जत-जामखेड : 334133.
Latest Marathi News Nagar : वर्षभरात वाढले जिल्ह्यात 43216 मतदार Brought to You By : Bharat Live News Media.
