आक्षेपार्ह पोस्टमुळे युवकास अटक, भगूर परिसरात तणाव

देवळाली कॅम्प : Bharat Live News Media वृत्तसेवा- नाशिकच्या भगूर येथे अमन मोहम्मद शफी शेख उर्फ मुस्तफा (22) या युवकाने समाजमाध्यमात श्रीराम भगवान प्रतिष्ठापणेविरोधात इंस्टाग्रामवर हिंदू विरोधी पोस्ट टाकल्याने भगूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी संबंधित युवकाला तत्काळ अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
राम मंदिर सोहळ्याचा देशभर जल्लोष साजरा होत असताना भगूर येथील युवकाने टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे शहरात रात्री काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच दक्षता घेत संबंधित युवकाला ताब्यात घेतल्याने तणाव निवळला. संबंधित युवकाने बाबरी मशिदीचा फोटो व त्याखाली चिथावणीखोर पोस्ट लिहून ती व्हायरल केली होती. रात्री एक वाजता संबंधित युवकाला ताब्यात घेत पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा :
Supriya Sule : रोहित पवारांची ईडीकडून चौकशी सुरू : सुप्रिया सुळे म्हणाल्या…
Crime News : पाच जणांकडून 25 लाखांचे अमली पदार्थ जप्त
Pune : शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात 31 लाख मतदार
Latest Marathi News आक्षेपार्ह पोस्टमुळे युवकास अटक, भगूर परिसरात तणाव Brought to You By : Bharat Live News Media.
