मुख्यमंत्री शिंदेंसह अख्ख मंत्रिमंडळ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अयोध्येला

Bharat Live News Media ऑनलाईन : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अयोध्येतील राम मंदिराला भेट देणार आहेत.
गेल्या सोमवारी (दि.२२ जानेवारी) अभिजित मुहूर्तावर रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी जन्मभूमीला श्रीराम मिळाला. शतकानुशतके हक्काच्या घराशिवाय व पुढे दशकानुदशके तंबूत राहण्याची वेळ ओढावलेल्या श्री रामलल्लांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षमायाचना केली. त्यांच्या मुख्य उपस्थितीत देशभरातील विविध पंथ-संप्रदायातील संतसमुदाय तसेच कोट्यवधी श्रीराम भक्तांच्या साक्षीने जन्मभूमीतील भव्यदिव्य मंदिरातील गर्भगृहात मंत्रोच्चारण, शंखध्वनीच्या गजरात श्री रामलल्लांना विराजमान करण्यात आले.
Maharashtra CM Eknath Shinde along with Deputy CMs Devendra Fadnavis and Ajit Pawar and their cabinet colleagues to visit Ayodhya Ram Temple in the first week of February
(file photos) pic.twitter.com/gYBjhHPukc
— ANI (@ANI) January 24, 2024
The post मुख्यमंत्री शिंदेंसह अख्ख मंत्रिमंडळ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अयोध्येला appeared first on Bharat Live News Media.
