वातावरण बदलाने गहू पडला पिवळा

कवडदरा(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा रब्बी हंगामात लागवड करण्यात आलेल्या गव्हावर वातावरण बदलामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गव्हाच्या लोंब्यात पिवळेपणा वाढला आहे. तसेच मर रोगाचाही प्रादुर्भाव वाढल्याने पिकाची वाढ देखील खुंटली आहे. इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, घोटी खुर्द, पिंपळगाव, भरवीर परिसरात काही शेतकऱ्यांनी गव्हाची उशिरा पेरणी केली होती. हा गहू अचानक पिवळा दिसू लागला आहे. … The post वातावरण बदलाने गहू पडला पिवळा appeared first on पुढारी.

वातावरण बदलाने गहू पडला पिवळा

कवडदरा(जि. नाशिक) : Bharat Live News Media वृत्तसेवा
रब्बी हंगामात लागवड करण्यात आलेल्या गव्हावर वातावरण बदलामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गव्हाच्या लोंब्यात पिवळेपणा वाढला आहे. तसेच मर रोगाचाही प्रादुर्भाव वाढल्याने पिकाची वाढ देखील खुंटली आहे.
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, घोटी खुर्द, पिंपळगाव, भरवीर परिसरात काही शेतकऱ्यांनी गव्हाची उशिरा पेरणी केली होती. हा गहू अचानक पिवळा दिसू लागला आहे. तसेच मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे गव्हाची वाढ खुंटली आहे. अवकाळी पावसानंतर हरभऱ्यावर मर रोग आल्यावर अनेक शेतकऱ्यांनी हरभरा मोडून गव्हाची पेरणी केली. मात्र आता त्यावरही संकट ओढवल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
खरिपाचा हंगाम चांगला आला नसल्याने रब्बीमध्ये चांगल्या उत्पनाच्या हेतूने हरभऱ्याची लागवड केली. मात्र यावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला. यामुळे हे पीक काढून गव्हाची लागवड केली. आता त्यावर देखील रोगाचा प्रादुर्भाव वाढला व गव्हाची वाढ देखील खुंटली आहे. यामुळे हा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :

माझ्‍यावर गुन्‍हा दाखल करा : राहुल गांधींचे आसाम पोलिसांना आव्‍हान
पुणेकरांवर 17 वर्षांपासून थंडी रुसलेलीच ! 2006 नंतर किमान तापमान 9 ते 10 अंशांखाली गेले नाही
महात्मा गांधी अवमान : खासगी फौजदारी तक्रार दाखल करून घेणे योग्य ; जिल्हा व सत्र न्यायालयाचा आदेश

Latest Marathi News वातावरण बदलाने गहू पडला पिवळा Brought to You By : Bharat Live News Media.