भगव्या टोप्या आणि महाराजांच्या नावाचा जयघोष ! जरांगे पाटील पुणे शहरात दाखल

पुणे ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षण आंदोलनाची दिंडी आता पुण्याच्या वेशीवर दाखल झाली आहे. कडक्याची थंडी असो किंवा इतर कोणत्याही अडचणीला न जुमानता पुणेकरांनी लाखोंच्या संख्येने या पायी दिंडीला प्रतिसाद दिला आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या पायी दिंडीचा आज पाचवा दिवस आहे. आज सकाळी वाघोलीपासून सुरू झालेली ही दिंडी आता चंदननगर येथे पोहोचली आहे. गेल्या पाच दिवसापासून जवळपास अर्धा संसारसोबत घेऊन अनेक मराठा समाजबांधव या दिंडीत सहभागी झाले आहेत.
असा असेल पायी दिंडीचा प्रवास :
महालक्ष्मी लाॅन्स , खराडी येथून सुरवात
नगर रोडने – येरवडा – बंडगार्डन – जहांगिर हाॅस्पिटल – आर.टी.ओ. – संगमपूल – संचेती हाॅस्पिटल – शिवाजीनगर – ॲग्रिकल्चर काॅलेज चौक – सावित्रीबाई फुले , पुणे विद्यापीठ चौक – औंध – डांगे चौक मार्गे मुंबईकडे रवाना
पाहा दिंडीचे फोटो :
Latest Marathi News भगव्या टोप्या आणि महाराजांच्या नावाचा जयघोष ! जरांगे पाटील पुणे शहरात दाखल Brought to You By : Bharat Live News Media.
