आसाम रायफल्सच्या जवानाकडून सहकाऱ्यांवर गोळीबार; ६ जण जखमी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानाने स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी सहकाऱ्यांवर केलेल्या गोळीबारात ६ जण जखमी झाले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मणिपूरमध्ये भारत-म्यानमार सीमेवर तैनात आसाम रायफल्सच्या जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली. Manipur Assam Rifles
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी हा जवान रजा काढून चुरचंदपूर येथील आपल्या घरी परतत असताना त्यांने हे कृत्य केले. भारत-म्यानमार सीमेजवळ दक्षिण मणिपूरमधील आसाम रायफल्स बटालियनमध्ये ही घटना आज (दि.२४) घडली. गोळीबार करणारा जवान हा हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील चुरचंदपूरचा रहिवासी असून कुकी समुदायाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. तर गोळीबारात जखमी झालेले जवान मेईटीस किंवा मणिपूरचे रहिवासी नाहीत. Manipur Assam Rifles
या गोळीबारामागचा हेतू स्पष्ट झालेला नाही. अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. आसाम रायफल्सने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, मणीपूरमध्ये सुरू असलेल्या (जातीय) संघर्षाशी या घटनेचा संबंध जोडू नये. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या वांशिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अफवा पसरवू नये. याबाबत कोणत्याही प्रकारचा अंदाज वर्तविण्याची गरज नाही.
या घटनेबद्दल अचूक आणि पारदर्शक माहिती देणे महत्त्वाचे आहे. आसाम रायफल्सच्या सर्व बटालियनमध्ये मणिपूरमधील विविध समुदायातील लोकांसह सर्व स्तरातील कर्मचारी आहेत. समाजाचे ध्रुवीकरण असूनही मणिपूरमध्ये शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी सर्व जवान एकत्र राहत असून काम करत आहे. दरम्यान, या घटनेनंतर आसाम रायफल्सने मणिपूरमध्ये सुरू असलेल्या जातीय हिंसाचाराशी याचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
Assam Rifles soldier in Manipur opens fire on colleagues before shooting self; 6 injured but stable
Read @ANI Story | https://t.co/JJbcZMOW4h#AssamRifles #Manipur pic.twitter.com/URaTRirm0I
— ANI Digital (@ani_digital) January 24, 2024
हेही वाचा
विरोधकांच्या INDIA आघाडीला मोठा धक्का! ममता बॅनर्जींचा लोकसभेसाठी ‘एकला चलो रे’चा नारा
Desert Knight Exercise : भारतीय हवाई दलाचा फ्रान्स, यूएई सोबत डेझर्ट नाइटचा सराव
अयोध्येत राम भक्तांची लाट; सलग दुसऱ्या दिवशी रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
Latest Marathi News आसाम रायफल्सच्या जवानाकडून सहकाऱ्यांवर गोळीबार; ६ जण जखमी Brought to You By : Bharat Live News Media.
