वयाच्या ४३ व्या वर्षी रोहन बोपण्णाने इतिहास रचला, पुरुष दुहेरीत बनला नंबर-१
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णा याने वयाच्या ४३ व्या वर्षी बुधवारी (२४ जानेवारी) इतिहास रचला. त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेनसह त्याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरी गाठली. या दोघांनी मिळून पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी या जोडीचा पराभव केला. रोहन आणि एबडेन यांनी अर्जेंटिनाच्या जोडीचा ६-४, ७-६ (७-५) अशा फरकाने पराभव केला. (Australian Open 2024) या विजयाने बोपन्ना पुरुष दुहेरीत नंबर १ बनला आहे.
बोपण्णाने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये प्रथमच पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीतील विजयासह त्यांनी इतिहासही रचला. त्याने पुरुष दुहेरी टेनिस क्रमवारीत अव्वल स्थान गाठले. त्याने प्रथमच ही कामगिरी केली. विशेष म्हणजे वयाच्या 43 व्या वर्षी तो पहिल्यांदाच टॉपवर पोहोचला आहे. बोपण्णा प्रथमच नंबर-1 बनणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. (Australian Open 2024)
बोपन्नाने राजीव रामचा विक्रम मोडला
भारतीय टेनिस बोपन्नाने अमेरिकेच्या राजीव रामला हरवून नवा विक्रम रचला. राजीव राम त्याच्या कारकिर्दीत ऑक्टोबर 2022 मध्ये वयाच्या 38 व्या वर्षी प्रथमच शीर्षस्थानी पोहोचला होता. त्यांने ग्रेट ब्रिटनचा सहकारी जो सॅलिसबरी यांला मागे टाकले.
गेल्या वर्षी यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पराभव
मेलबर्न पार्क येथे सलग १७ वी स्पर्धा खेळत असलेल्या बोपण्णाने कोर्ट ३ वरील विजयासह कारकिर्दीत प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्य फेरी गाठली. तिसरी फेरी गाठणे ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. सहा वेळा तो उपांत्यपूर्व फेरीत बाहेर पडला. स्पर्धा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी बोपण्णा नव्या क्रमवारीत अव्वल स्थानावर दिसणार आहे. बोपण्णा आणि एबडेन ही जोडी गेल्या वर्षी यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पराभूत झाली होती. चार महिन्यांनंतर दोघेही पुन्हा ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.
सर्व ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत प्रवेश
बोपण्णाच्या या विजयाने सर्व ग्रँडस्लॅममध्ये किमान उपांत्य फेरी गाठण्याचा विक्रम पूर्ण केला आहे. 2011, 2016, 2018 आणि 2021 मध्ये चार उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर बोपण्णाने 2022 मध्ये मॅटवे मिडेलकूपसह फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठली. विम्बल्डनमध्ये त्याने 2013, 2015 आणि 2023 मध्ये तीन वेळा उपांत्य फेरी गाठली होती. त्याच वेळी, तो दोनदा (2010 आणि 2023) यूएस ओपनमध्ये अंतिम फेरीत पोहोचला आहे.
खास विक्रम करण्याची बोपण्णाला संधी
दुसऱ्या मानांकित पुरुष दुहेरी जोडीचा पुढील सामना चीनच्या बिगरमानांकित झांग झिझेन आणि चेक प्रजासत्ताकच्या टॉमस माचक यांच्याशी होणार आहे. झझेन आणि माचक यांनी मंगळवारी उपांत्यपूर्व फेरीत अॅडम पावलासेक आणि एरियल बेहार यांचा 6-3, 6-1 असा पराभव केला. बोपण्णा पुरुष दुहेरीतील त्याच्या पहिल्या ग्रँडस्लॅम ट्रॉफीजवळ पोहचला आहे. त्याने 2017 मध्ये कॅनडाच्या गॅब्रिएला डॅब्रोव्स्कीसोबत फ्रेंच ओपन जिंकली होती. एब्डेनबद्दल सांगायचे तर, त्याने मिश्र दुहेरी आणि पुरुष दुहेरीमध्ये ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. बोपण्णाने विजेतेपद पटकावल्यास तो ग्रँडस्लॅम पुरुष दुहेरी चॅम्पियन बनणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनेल.
@rohanbopanna getting to World Number 1 today after 20 years on tour in my opinion is one of the greatest stories in Indian Sport!!! @AustralianOpen #Bofors
— Mahesh Bhupathi (@Maheshbhupathi) January 24, 2024
हेही वाचा :
Nashik News I अल्पवयीनांच्या वाढत्या बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे पोलिसांपुढे आव्हान
Kabul : गर्भनिरोधके विकत घेतल्यास भोगावा लागणार तुरुंगवास
कुलगुरुपद नियुक्ती : सीओईपी’चे डॉ सुनील भिरुड, ‘बामु’चे डॉ विजय फुलारी, तर अमरावतीचे डॉ मिलिंद बारहाते
The post वयाच्या ४३ व्या वर्षी रोहन बोपण्णाने इतिहास रचला, पुरुष दुहेरीत बनला नंबर-१ appeared first on Bharat Live News Media.