बी. टी. कवडे रस्त्यावर अपघाताचा धोका

मुंढवा  : पुढारी वृत्तसेवा :  घोरपडी येथील बी. टी. कवडे रस्त्याच्या दुभाजकामध्ये आठ ते दहा ठिकाणी पंक्चर आहेत. त्यामधून दुचाकी वाहने नेली जात असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी एक फूट उंचीचे बांधकाम करावे, त्यामुळे येथून वाहने जाणार नाहीत व पादचार्‍यांनाही रस्ता ओलांडणे सोईचे होईल, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे. बी. टी. … The post बी. टी. कवडे रस्त्यावर अपघाताचा धोका appeared first on पुढारी.

बी. टी. कवडे रस्त्यावर अपघाताचा धोका

मुंढवा  : Bharat Live News Media वृत्तसेवा :  घोरपडी येथील बी. टी. कवडे रस्त्याच्या दुभाजकामध्ये आठ ते दहा ठिकाणी पंक्चर आहेत. त्यामधून दुचाकी वाहने नेली जात असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी एक फूट उंचीचे बांधकाम करावे, त्यामुळे येथून वाहने जाणार नाहीत व पादचार्‍यांनाही रस्ता ओलांडणे सोईचे होईल, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे. बी. टी. कवडे रस्त्यावरील वाहतुकीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नवीन रेल्वे उड्डाणपूल खुला झाल्यावर येथील वाहतुकीमध्ये वाढ होणार आहे.

मुख्य रस्त्याच्या आजूबाजूला राहणा-या नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना भरधाव वाहनांमुळे रस्ता ओलांडने जिकिरीचे बनते. या रस्त्यावरिल गतिरोधकांवर झेब—ा क्रॉसिंग नसल्याने वाहनांना गतिरोधकाचा अंदाज येत नाही. त्यामुळे या रस्त्यावरील गतिरोधकांवर झेब—ा क्रॉसिंग मारावेत व लहान आकाराचे पंक्चर बंद करावेत. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. याविषयी वाहतूक पोलिसांची परवानगी घेऊन पुढील प्रक्रिया केली जाईल. असे पालिकेच्या पथ विभागाकडून सांगण्यात आले.

वाहतुकीत होणार वाढ
घोरपडी येथील थोपटे चौकामधील रेल्वे उड्डाणपुलाचे उद्घाटन येत्या एक-दोन महिन्यांत होईल. त्यावेळी शहराकडे जाण्या-येण्यासाठी मुंढवा व केशवनगर परिसरातील नागरिकांची या पुलावर वर्दळ वाढणार आहे. त्यामुळेच सहाजिकच बी. टी. कवडे रस्त्यावरील वाहतूकीमध्येही वाढ होणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणीच पंक्चर ठेऊन बाकी पंक्चर बंद करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले.

बी. टी. कवडे रस्त्यावरील लहान पंक्चरमधून दुचाकी वाहने व सायकल घुसडण्याचा प्रकार  होत असल्याने अपघातसदृश स्थिती तयार होत आहे. पालिकेने येथील लहान पंक्चर तातडीने बंद करावेत.
                                                                                          – कुमार चक्रे, सामाजिक कार्यकर्ते, घोरपडी

Latest Marathi News बी. टी. कवडे रस्त्यावर अपघाताचा धोका Brought to You By : Bharat Live News Media.