अयोध्येत राम भक्‍तांची लाट; सलग दुसऱ्या दिवशी भाविकांच्या रांगा

अयोध्या ; पुढारी ऑनलाईन अयोध्येतील राम मंदिरात रामलल्‍लाच्या प्रतिष्‍ठापणेनंतर आज सलग दुसऱ्या दिवशीही राम भक्‍तांमध्ये राम लल्‍लाच्या दर्शनासाठी मोठा उत्‍साह दिसून आला. मंगल आरतीनंतर दर्शन सुरू आहे. अधिकाऱ्यांनी आज गर्दी नियंत्रणात असल्‍याचे म्‍हंटले आहे. प्राण प्रतिष्‍ठेच्या दुसऱ्याच दिवशी काल मंगळवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिर परिसरात येण्यासाठी भाविकांचे धक्‍काबुक्‍कीचे प्रसंग घडले. यामुळे या ठिकाणची … The post अयोध्येत राम भक्‍तांची लाट; सलग दुसऱ्या दिवशी भाविकांच्या रांगा appeared first on पुढारी.

अयोध्येत राम भक्‍तांची लाट; सलग दुसऱ्या दिवशी भाविकांच्या रांगा

अयोध्या ; Bharat Live News Media ऑनलाईन अयोध्येतील राम मंदिरात रामलल्‍लाच्या प्रतिष्‍ठापणेनंतर आज सलग दुसऱ्या दिवशीही राम भक्‍तांमध्ये राम लल्‍लाच्या दर्शनासाठी मोठा उत्‍साह दिसून आला. मंगल आरतीनंतर दर्शन सुरू आहे. अधिकाऱ्यांनी आज गर्दी नियंत्रणात असल्‍याचे म्‍हंटले आहे.
प्राण प्रतिष्‍ठेच्या दुसऱ्याच दिवशी काल मंगळवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिर परिसरात येण्यासाठी भाविकांचे धक्‍काबुक्‍कीचे प्रसंग घडले. यामुळे या ठिकाणची व्यवस्‍था कोलमडल्‍याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांसोबत झालेल्‍या बैठकीत यावर प्रश्न उपस्‍थित झाले. यानंतर हा निर्णय घेण्यात आला की, मंदिराच्या बाहेरूनच दर्शनासाठी रांगा लावण्यात येतील.
स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संयमाने दर्शन घेण्याचे आवाहन केले. याचा परिणाम आज (बुधवार) पहायला मिळाला. आज बुधवार दर्शन रांगेची व्यवस्‍था केल्‍याने हजारो भाविकांच्या येण्यानेही योग्‍य पद्धतीने वीना धक्‍का-बुक्‍की करता दर्शन सुरू आहे. मोठ मोठ्या रांगा सकाळपासूनच मंदिराबाहेर लागल्‍याचे दिसून आले.
आज वरिष्ठ अधिकारी गर्भगृहात उपस्थित आहेत. सकाळपासूनच भाविकांना रीतसर रांगा लावून दर्शन दिले जात आहे. भक्त जय श्री रामचा नारा देत आहेत.
रामलल्‍ला प्राणप्रतिष्ठेनंतर दुसऱ्या दिवशी श्री रामलल्लाच्या दर्शनासाठी रामपथवर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. तत्पूर्वी, मंगळवारी, रामलल्‍लाच्या अभिषेकाच्या दुसऱ्या दिवशी, रामभक्तांचा पूर मंदिरात जमला होता. पहाटे तीन वाजल्यापासूनच रामजन्मभूमी मार्गावर भाविकांचे आगमन सुरू झाले.
प्राणप्रतिष्ठेनंतर पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनाचा नवा विक्रमही निर्माण केला. मंगळवारी श्री राम दरबारात पाच लाख भाविकांनी हजेरी लावली. रात्री ९ वाजेपर्यंत मंदिरात दर्शन घेतले गेले. व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत: संध्याकाळी पुढाकार घेतला. अयोध्येत पोहोचल्यानंतर त्यांनी भाविकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले.
उत्तर प्रदेशचे विशेष एडीजीएलओ प्रशांत कुमार यांनी सांगितले की, येथे लोकांची मोठी गर्दी झाली आहे. मुख्य गृह सचिव आणि मी येथे आलो आहोत. शिस्तबद्ध पद्धतीने गर्दीचे नियोजन केले जात आहे. आम्ही लोकांसाठी चॅनेल तयार केले आहेत.

#WATCH | Ayodhya, Uttar Pradesh: On the second day after the Pran Pratishtha, devotees gather in huge numbers at Rampath to have darshan of Shri Ram Lalla pic.twitter.com/JMI3AvYPca
— ANI (@ANI) January 24, 2024

#WATCH | Ayodhya, Uttar Pradesh: On the second day after the Pran Pratishtha, devotees gather in huge numbers at Rampath to have darshan of Shri Ram Lalla pic.twitter.com/JASRLykuWE
— ANI (@ANI) January 24, 2024

हेही वाचा : 

Bank loan fraud case | बँक कर्ज फसवणूक प्रकरणी DHFLच्या वाधवान बंधूंचा जामीन रद्द 
मग, आता फडणवीस का आरक्षण देत नाहीत? : नाना पटोले

राम मंदिराचा उपयोग राजकारणासाठी : काँग्रेस प्रभारी रमेश चेंनिथला

Latest Marathi News अयोध्येत राम भक्‍तांची लाट; सलग दुसऱ्या दिवशी भाविकांच्या रांगा Brought to You By : Bharat Live News Media.