29 वर्षांची आई, 22 वर्षांची लेक!

न्यूयॉर्क : बर्याच वेळा अनेक ठिकाणी माय-लेकीच्या अशा जोड्या दिसतात, ज्यामध्ये आईचं सौंदर्य पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. सध्या आपल्याकडे सिनेसृष्टीत अशीच एक जोडी आहे. श्वेता तिवारी आणि तिची मुलगी पलक. या दोघी माय-लेकी नाही तर बहिणी वाटतात! अशाच एका माय-लेकीची सध्या सोशल मीडियावर होते आहे. आई 29 वर्षांची तर लेक 22 वर्षांची आहे, हे कसं काय होऊ शकतं? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. अर्थात दोघींमधील नाते सावत्र आई आणि लेक असे आहे. मात्र, दोघींना सोशल मीडियावर जुळ्या बहिणी म्हणून म्हटलं जातं आहे.
काही आई आणि मुलींच्या वयात कमी फरक असल्याचे अनेकदा समोर आलं आहे. यामागील कारणे ही वेगवेगळी असतात. मात्र, सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेल्या या माय-लेकीच्या जोडीचे सत्य समजल्यावर तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. या दोघी माय-लेकीमध्ये केवळ 7 वर्षांचा फरक आहे. या दोघी जुळ्या बहिणी वाटतात; पण सर्वांना ही टिझीची सावत्र आई आहे. सवाना ही हेअरस्टाईलिस्टच्या कामासाठी क्रिसच्या ब्युटी सलूनमध्ये गेली होती. त्यावेळी एकत्र काम करता करता सवाना आणि ख्रिस प्रेमात पडेल आणि त्यांनी लग्न केलं. दोघेही आधीच्या नातेसंबंधात खूश नव्हते. या दोघांमध्येही 16 वर्षांच्या फरक असूनही त्यांनी आयुष्याला दुसरा चान्स देण्याचं ठरवलं आणि लग्न केलं. खरं तर ख्रिसला आधीपासून एक मुलगी होती.
ख्रिसची मुलगी टिझी आणि नवीन बायकोच्या वयातील फरक यामुळे सवाना घाबरली होती. सवाना म्हणाली की, ‘सुरुवातीला टिझीला आमचं नातं अजिबात आवडले नाही.’ एवढंच नाही तर सोशल मीडियावर मला लोकांकडून टोमणे आणि तिच्या आरोपांना उत्तर द्यावे लागले; पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिने आपल्या सावत्र मुलीवर प्रेम व्यक्त करणे थांबवलं नाही. काही वेळ गेल्यानंतर या दोघींमध्ये मैत्रीचं नात जुळलं गेलं. विशेष म्हणजे या दोघींचे अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियात मिळतात. सवानाने एका व्हिडीओमध्ये सांगितलं आहे की, ‘आता दोघी चांगल्या मैत्रिणी आहोत.’ या दोघी मायलेकीने मिळून कपड्यांचा एक ब्रँडही सुरू केला आहे.
Latest Marathi News 29 वर्षांची आई, 22 वर्षांची लेक! Brought to You By : Bharat Live News Media.
