जर्मनीच्या आसमंतात उल्केचा स्फोट!

बर्लिन : अनेक उल्का या पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच जळून जात असतात. पृथ्वीवर कोसळणार्‍या उल्कांची खगोलशास्त्रज्ञांनी आधीच माहिती मिळवलेली असते; पण काही उल्कांचा छडा त्या पृथ्वीच्या वातावरणात आल्यावरच लागतो. आता अशाच एका उल्केचा जर्मनीच्या आसमंतात स्फोट झाला. ती पृथ्वीवर कोसळली असती तर राजधानी बर्लिन आणि आजुबाजूच्या परिसराला धोका निर्माण झाला असता. अर्थातच सहसा असे घडत … The post जर्मनीच्या आसमंतात उल्केचा स्फोट! appeared first on पुढारी.

जर्मनीच्या आसमंतात उल्केचा स्फोट!

बर्लिन : अनेक उल्का या पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच जळून जात असतात. पृथ्वीवर कोसळणार्‍या उल्कांची खगोलशास्त्रज्ञांनी आधीच माहिती मिळवलेली असते; पण काही उल्कांचा छडा त्या पृथ्वीच्या वातावरणात आल्यावरच लागतो. आता अशाच एका उल्केचा जर्मनीच्या आसमंतात स्फोट झाला. ती पृथ्वीवर कोसळली असती तर राजधानी बर्लिन आणि आजुबाजूच्या परिसराला धोका निर्माण झाला असता. अर्थातच सहसा असे घडत नाही.
बर्लिनजवळील लाईपझिग नावाच्या परिसरात ही उल्का दिसली. सुदैवाने पृथ्वीवर कोसळण्यापूर्वीच तिच्यामध्ये स्फोट झाला व तुकडे विखरून पडले. आता शास्त्रज्ञ या तुकड्यांचा शोध घेत आहेत. 21 जानेवारीच्या भल्या पहाटे ही घटना घडली. अचानक एक तेजस्वी प्रकाश आकाशातून खाली येत होता. ही उल्का कोसळण्यापूर्वीच तिचा स्फोट झाला व हा प्रकाश आकाशात विरून गेला.
युरोपियन स्पेस एजन्सीने म्हटले आहे की 99 टक्के उल्का धोकादायक नसतात. बहुतांश उल्का या अतिशय लहान आकाराच्या असतात. लहान उल्का शोधणे, त्यांचा मार्ग आणि ड्रॉप पॉईंट शोधणे हे कठीण काम असते. 2013 मध्ये रशियातील शेलियाबिन्स्कमध्ये एक उल्का वेगाने कोसळली होती. यामुळे संपूर्ण शहरातील इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या.
Latest Marathi News जर्मनीच्या आसमंतात उल्केचा स्फोट! Brought to You By : Bharat Live News Media.