विमान जाणार होते एका देशात, पोहोचले दुसर्‍याच देशात!

लंडन : ‘चलती का नाम गाडी’ मधील एका गाण्यात ‘जाते ते थे जापान, पहूँच गए चीन, समझ गये ना’ अशा ओळी आहेत. या ओळी अनेकांच्या जीवनात अनेक वेळा सार्थ होत असताना दिसत असतात. गाडीत बसल्या बसल्या डोळा लागला की अनेकांना आपला स्टॉप येऊन गेल्याचेही कळत नाही. मात्र, विमान प्रवासात असे घडेल याची शक्यता नसते. तरीही … The post विमान जाणार होते एका देशात, पोहोचले दुसर्‍याच देशात! appeared first on पुढारी.

विमान जाणार होते एका देशात, पोहोचले दुसर्‍याच देशात!

लंडन : ‘चलती का नाम गाडी’ मधील एका गाण्यात ‘जाते ते थे जापान, पहूँच गए चीन, समझ गये ना’ अशा ओळी आहेत. या ओळी अनेकांच्या जीवनात अनेक वेळा सार्थ होत असताना दिसत असतात. गाडीत बसल्या बसल्या डोळा लागला की अनेकांना आपला स्टॉप येऊन गेल्याचेही कळत नाही. मात्र, विमान प्रवासात असे घडेल याची शक्यता नसते. तरीही आता असाच एक प्रकार घडला आहे. विमानातील प्रवासी झोपेतून उठल्यावर त्यांना समजले की आपल्याला ज्या देशात जायचे होते तिथे न पोहोचता आपण दुसर्‍याच देशात आलो आहे! हा सगळा गोंधळ ‘ईशा’ नावाच्या वादळाने झाला!
या ‘ईशा’ने ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये बराच उपद्रव केला आहे. वादळामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. पश्चिम युरोपमधील अनेक उड्डाणे या वादळाने प्रभावित झाली. डझनभर उड्डाणे रद्द करण्यात आली, तर अनेक उड्डाणांचे मार्ग बदलण्यात आले. सोमवारी रात्री आयर्लंड आणि युकेमधून प्रवास करणार्‍यांसाठी विमान प्रवास अडचणीचा ठरला. त्यावेळी धावपट्टीवर ताशी 90 मैल वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे पश्चिमेकडे जाणारी अनेक विमाने युरोपमध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आली.
अशा स्थितीत अनेक प्रवाशांना आपण गंतव्यस्थानी न पोहोचता भलत्याच ठिकाणी आल्याचे पाहून मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागले. एका विमानाने कॅनरी बेटांपैकी लॅन्झारोटे येथून डब्लिनकडे उड्डाण केले. त्यादरम्यान विमान आयरिश राजधानीजवळ आले, परंतु मागे वळून उतरण्याचा प्रयत्न न करता ते फ्रान्सच्या बोर्डोकडे वळले. आणखी एक विमान मँचेस्टरहून डब्लिनला जाणार होते. मात्र, होल्डिंग पॅटर्नजवळ फिरल्यानंतर डब्लिनमध्ये उतरण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यामुळे ते पॅरिस ब्युवेसकडे वळले. या प्रकारांमुळे प्रवासी बुचकळ्यात पडले!
Latest Marathi News विमान जाणार होते एका देशात, पोहोचले दुसर्‍याच देशात! Brought to You By : Bharat Live News Media.