Nashik News I अल्पवयीनांच्या वाढत्या बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे पोलिसांपुढे आव्हान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातून मागील वर्षी २४९ अल्पवयीन मुली व ५८ मुले बेपत्ता (missing) झाली होती. कायद्यानुसार संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करीत त्यांचा शोध सुरू केला. त्यानुसार वर्षभरात शहर पोलिसांनी १४९ मुली व ५० मुलांचा शोध घेत त्यांना पालकांच्या ताब्यात दिले. तर ५५ मुली व ८ मुले अशा ६३ जणांचा शोध अद्याप … The post Nashik News I अल्पवयीनांच्या वाढत्या बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे पोलिसांपुढे आव्हान appeared first on पुढारी.

Nashik News I अल्पवयीनांच्या वाढत्या बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे पोलिसांपुढे आव्हान

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
शहरातून मागील वर्षी २४९ अल्पवयीन मुली व ५८ मुले बेपत्ता (missing) झाली होती. कायद्यानुसार संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करीत त्यांचा शोध सुरू केला. त्यानुसार वर्षभरात शहर पोलिसांनी १४९ मुली व ५० मुलांचा शोध घेत त्यांना पालकांच्या ताब्यात दिले. तर ५५ मुली व ८ मुले अशा ६३ जणांचा शोध अद्याप घेतला जात आहे. प्रेमप्रकरण, रागाच्या भरात, पालकांचा धाक किंवा तात्कालिक कारणांमुळे मुले-मुली घर सोडून जात असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.
शहरातून अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटना घडत असतात. बेपत्ता (missing) मुला-मुलींचा शोध स्थानिक पोलिसांसह मानवी तस्करीविरोधी पथक, निर्भया, दामिनी पथक घेत असतात. त्यासाठी ते शहरासह जिल्हा, राज्यभरात गरज भासल्यास परराज्यातही तपास करतात. त्यामुळे तांत्रिक पुरावे, खबऱ्यांकडील माहितीच्या आधारे पोलिस बेपत्ता मुला-मुलींचा शोध घेत असतात. मागील वर्षात शहरात अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणाबाबत ३०७ गुन्हे दाखल असून, त्यापैकी १९९ मुला-मुलींचा शोध लागला आहे.
पोलिस तपासात अल्पवयीन मुला-मुलींना फूस लावून पळवून नेले जाते. कधी रागाच्या भरात घर सोडून निघून जाणे, अभ्यासाचा, पालकांचा धाक राहिल्यास घर सोडणे किंवा काहीतरी वेगळे करण्याच्या अपेक्षेनेही काही जण घर सोडून निघून जात असल्याचे समोर आले आहे. अशावेळी पालक त्यांच्या पाल्यांचा शोध घेत पोलिसांकडेही तक्रार करतात. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करीत पोलिस शोध घेतात. यासाठी विविध पथकांचेही पोलिस तपास करीत असतात.
संवाद वाढवण्याची गरज
पोलिस तपासात पालक आणि पाल्यांमध्ये संवाद जास्त होत नसल्याचे निरीक्षण समोर आले. मैत्रीपूर्ण नाते नसल्याने अल्पवयीन मुलं-मुली बाहेरील व्यक्तीवर विश्वास ठेवून किंवा सोशल मीडिया (Social Media) च्या प्रभावात येऊन वागतात. त्यामुळे मुला-मुलींच्या वर्तवणुकीसह, त्यांचे मित्रपरिवार, सोशल मीडिया यावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले जाते.
बेपत्ता मुला-मुलींची आकडेवारी (कंसात सापडलेले)
वर्ष              बेपत्ता मुले               बेपत्ता मुली
२०२२             ५७ (५६)             २६५ (२५३)
२०२३              ५८ (५०)             २४९ (१९४)
हेही वाचा:

पक्षांतर्गत निवडणुकीची कागदपत्रे कपाटातून गायब; आव्हाडांचा गौप्यस्फोट
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील पौरोहित्य केले बीडच्या पुरोहिताने
Horoscope Today : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | बुधवार, २४ जानेवारी २०२४

Latest Marathi News Nashik News I अल्पवयीनांच्या वाढत्या बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे पोलिसांपुढे आव्हान Brought to You By : Bharat Live News Media.