
मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा,
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रो प्रकरणात आज (दि.२४) ‘ईडी’कडून चौकशी केली जाणार आहे. यावेळी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेही रोहित यांच्यासोबत ‘ईडी’ कार्यालयापर्यंत जाणार आहेत. दरम्यान, रोहित यांची ‘ईडी’कडून चौकशी सुरू असताना शरद पवार हे पक्षाच्या कार्यालयात चौकशी पूर्ण होईपर्यंत बसून राहणार आहेत. (Rohit Pawar)
माझ्यासोबत सुप्रिया सुळे आणि स्वतः शरद पवार येत आहेत. वय झाले म्हणून काय झाले. वय झालेली माणसे तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल, तर आणखी काय हवे, असे ट्रे रोहित पवार म्हणाले.
Latest Marathi News रोहित पवार आज ‘ईडी’च्या कार्यालयात हजर राहणार Brought to You By : Bharat Live News Media.
