संसद भवन सुरक्षा ‘सीआयएसएफ’कडे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : संसद भवनाच्या सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) तैनात करण्यात आले आहे. संसदेतील घुसखोरीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे 140 जवान संसदेत तैनात करण्यात येणार आहेत. डोळ्यात तेल घालून संसदेतील सुरक्षेवर लक्ष केंद्रित करतील. गेल्या वर्षी 13 डिसेंबरला काही लोक संसदेत घुसले होते. त्यांनी सदनात रंगीत धूर सोडला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरक्षेचा आढावा घेतला होता. यानंतर सीआयएसएफ तैनात करण्यास मंजुरी देण्यात आली. आता संसदेच्या सुरक्षेत आधीच उपस्थित असलेल्या इतर सुरक्षा एजन्सींसह सीआयएसएफ सुरक्षा कर्मचार्यांनी संसद परिसराचा आढावा घेतला, जेणेकरून 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल तेव्हा ते सुरक्षेसाठी तयार असतील.
Latest Marathi News संसद भवन सुरक्षा ‘सीआयएसएफ’कडे Brought to You By : Bharat Live News Media.
