सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा 21 फेब्रुवारीला होणार

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 20 वा दीक्षांत सोहळा 21 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानिमित्त परीक्षा विभागाच्यावतीने तयारी सुरू आहे. यंदाच्या दीक्षांत सोहळ्यात तब्बल साडेआठ हजार विद्यार्थी प्रमाणपत्र घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा फेब्रुवारी महिन्यात होणार असल्यामुळे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने … The post सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा 21 फेब्रुवारीला होणार appeared first on पुढारी.

सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा 21 फेब्रुवारीला होणार

सोलापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 20 वा दीक्षांत सोहळा 21 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानिमित्त परीक्षा विभागाच्यावतीने तयारी सुरू आहे. यंदाच्या दीक्षांत सोहळ्यात तब्बल साडेआठ हजार विद्यार्थी प्रमाणपत्र घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा फेब्रुवारी महिन्यात होणार असल्यामुळे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने तयारी सुरू झाली आहे. दीक्षांत सोहळ्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींना बोलावण्यात येणार आहे. 110 महाविद्यालयांनाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पदवी प्रमापत्रासाठी विद्यापीठाकडे मोठ्या संख्येने अर्ज आलेले आहेत. बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., एम.ए. एम.कॉम., पदवी, पदव्युत्तर, एमफिल, पीएच.डी. आदी सर्व विभागांतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
Latest Marathi News सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा 21 फेब्रुवारीला होणार Brought to You By : Bharat Live News Media.