पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढविणार : खा. महाडिक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिंदे गटाकडे आहेत. भाजपला जागा मिळाल्यास आणि पक्षाने आदेश दिल्यास आपण लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार आहे, असे खा. धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. खा. महाडिक म्हणाले, राम मंदिराच्या उभारणीमुळे देशात मोदींशिवाय पर्याय नाही, हे जनतेला कळले आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनावेळी देशात सर्वच ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. … The post पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढविणार : खा. महाडिक appeared first on पुढारी.

पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढविणार : खा. महाडिक

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिंदे गटाकडे आहेत. भाजपला जागा मिळाल्यास आणि पक्षाने आदेश दिल्यास आपण लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार आहे, असे खा. धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
खा. महाडिक म्हणाले, राम मंदिराच्या उभारणीमुळे देशात मोदींशिवाय पर्याय नाही, हे जनतेला कळले आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनावेळी देशात सर्वच ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. छोट्या गावांपासून मोठ्या शहरापर्यंत सर्वत्र जनतेने साथ दिली आहे.
या दोन्ही जागांवर उमेदवारीबाबत अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. दोन्ही जागा शिंदे गटाकडे असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील. भाजपने एका जागेवर आग्रह धरला असून, आपण इच्छुक आहात का? याबाबत ते म्हणाले, मला याबाबत माहिती नाही. मात्र भाजपला जागा मिळाल्यास आणि पक्षाने आदेश दिल्यास मी निवडणूक लढविण्यास तयार आहे.
देशात भाजपला चांगले वातावरण असून, जनता भाजपसोबत आहे. त्यामुळे चारशेहून अधिक जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला.
Latest Marathi News पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढविणार : खा. महाडिक Brought to You By : Bharat Live News Media.