आज सीमावर्ती भागात विदर्भवाद्यांचे रस्ता रोको, सरकारला इशारा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आज (दि. 24 जानेवारी) विदर्भाच्या सावरगाव ता नरखेड बडचिचोली येथे मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात विदर्भवाद्यांचे रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. विदर्भ राज्यात आपले स्वागत असा बोर्ड लावून रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. यासोबतच दि. ४ फेब्रुवारी रोजी बहिरम जि. अमरावती येथे विदर्भ सीमेवर दि. ६ फेब्रुवारी रोजी पिंपळखुटी जि. यवतमाळ … The post आज सीमावर्ती भागात विदर्भवाद्यांचे रस्ता रोको, सरकारला इशारा appeared first on पुढारी.

आज सीमावर्ती भागात विदर्भवाद्यांचे रस्ता रोको, सरकारला इशारा

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : आज (दि. 24 जानेवारी) विदर्भाच्या सावरगाव ता नरखेड बडचिचोली येथे मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात विदर्भवाद्यांचे रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. विदर्भ राज्यात आपले स्वागत असा बोर्ड लावून रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. यासोबतच दि. ४ फेब्रुवारी रोजी बहिरम जि. अमरावती येथे विदर्भ सीमेवर दि. ६ फेब्रुवारी रोजी पिंपळखुटी जि. यवतमाळ ते तेलंगणा सीमेवर ८ फेब्रुवारी रोजी विदर्भ – तेलंगाना सीमेवरील पोळसा येथे दि. १० फेब्रुवारी रोजी विदर्भ छत्तीसगड सीमेवरील देवरी येथे विदर्भाचा बोर्ड लावून रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. याशिवाय दि. १२ फेब्रुवारी रोजी विदर्भ – खानदेश मलकापूर जि. बुलढाणा सिमेवर विदर्भाचा बोर्ड लावून रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.’अभी नही तो कभी नही” म्हणून विदर्भाचे आंदोलन भारतीय संविधानातील आर्टिकल ३ प्रमाणे येत्या संसदेच्या अधिवेशनात निर्माण करण्यास आंदोलनाद्वारे बाध्य करण्याकरीता ही आंदोलनांची श्रृंखला असल्याची माहिती माजी आमदार ऍड वामनराव चटप यांनी दिली.
कोर कमेटीच्या बैठकिला विदर्भ आंदोलनातील विराआंसचे नेते ऍड वामनराव चटप, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुणभाऊ केदार, युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मुकेश मासुरकर, डॉ. रमेशकुमार गजबे, प्रभाकर कोंडबत्तूनवार, कृष्णराव भोंगाडे, राजेंद्रसिंह ठाकूर, अरुण मुनघाटे, तेजराव मुंडे, राजेंद्र आगरकर, एड. सुरेश वानखेडे, अशोक पोरेड्डीवार, अंकुश वाघमारे, प्रकाश लड्ढा, सुनीता येरणे, डॉ. विजय सहारे, नरेश निमजे, मनीषा फुंडे, मंजुषा तिरपुडे, अयुब शेख, ज्योती खांडेकर, मधुसूदन कोवे आदी उपस्थित होते.
Latest Marathi News आज सीमावर्ती भागात विदर्भवाद्यांचे रस्ता रोको, सरकारला इशारा Brought to You By : Bharat Live News Media.