बुलढाणा : सास-याने केली गर्भवती सुनेसह आठ वर्षांच्या नातवाची हत्या; संग्रामपूर येथील घटना

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : एका व्यसनाधीन सास-याने नऊ महिन्याच्या गर्भवती सुनेची व आठ वर्षांच्या नातवाची कु-हाडीने घाव घालून निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज (दि.२३) दुपारी संग्रामपूर शहरात घडली. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संग्रामपूर येथील नारायण भिकाजी गायकी (वय ६५) याने राहत्या घरात नऊ महिन्यांची … The post बुलढाणा : सास-याने केली गर्भवती सुनेसह आठ वर्षांच्या नातवाची हत्या; संग्रामपूर येथील घटना appeared first on पुढारी.

बुलढाणा : सास-याने केली गर्भवती सुनेसह आठ वर्षांच्या नातवाची हत्या; संग्रामपूर येथील घटना

बुलढाणा; Bharat Live News Media वृत्तसेवा : एका व्यसनाधीन सास-याने नऊ महिन्याच्या गर्भवती सुनेची व आठ वर्षांच्या नातवाची कु-हाडीने घाव घालून निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज (दि.२३) दुपारी संग्रामपूर शहरात घडली. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संग्रामपूर येथील नारायण भिकाजी गायकी (वय ६५) याने राहत्या घरात नऊ महिन्यांची गर्भवती सुन अश्विनी गणेश गायकी(२४) व नातू समर्थ देवानंद गायकी (८)या दोघांवर अकस्मातपणे कु-हाडीने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केला.या घटनेत आठ वर्षीय नातू जागीच ठार झाला तर. गंभीर जखमी झालेल्या गर्भवती सुनेचा रूग्णालयात नेत असतांना वाटेत मृत्यू झाला.या घटनेतील नातू समर्थ हा आरोपीच्या मोठ्या मुलाचा मुलगा आहे तर सुन ही धाकट्या मुलाची पत्नी आहे. गर्भवती सुन अश्विनी हिची प्रसूती चार दिवसांवर आली असतांना माथेफिरू सास-याने तीची हत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आरोपी नारायण गायकी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने असे निर्दयी कृत्य करण्यामागचे कारण अद्याप समोर आले नाही.
Latest Marathi News बुलढाणा : सास-याने केली गर्भवती सुनेसह आठ वर्षांच्या नातवाची हत्या; संग्रामपूर येथील घटना Brought to You By : Bharat Live News Media.