नोरा फतेहीचा ‘तो’ व्हायरल व्हिडिओ! डीपफेकचा आरोप करत म्हणाली…

पुढारी ऑनलाईन डेस्क : नोरा फतेही सध्या एका प्रकरणामुळे खूप चर्चेत आली आहे. तिने इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओत स्वत: नोरा होती. मात्र या व्हिडिओतील काही दृश्ये पाहून नोराला मोठा धक्का बसला. ही व्हिडिओ डिपफेक असल्याचा आरोप करत तिने यामध्ये मी नाही असे स्पष्टपणे जाहीर केले आहे. नोराच्या आरोपांनंतर तिचा व्हिडिओ खूप चर्चेत आला, … The post नोरा फतेहीचा ‘तो’ व्हायरल व्हिडिओ! डीपफेकचा आरोप करत म्हणाली… appeared first on पुढारी.
नोरा फतेहीचा ‘तो’ व्हायरल व्हिडिओ! डीपफेकचा आरोप करत म्हणाली…


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नोरा फतेही सध्या एका प्रकरणामुळे खूप चर्चेत आली आहे. तिने इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओत स्वत: नोरा होती. मात्र या व्हिडिओतील काही दृश्ये पाहून नोराला मोठा धक्का बसला. ही व्हिडिओ डिपफेक असल्याचा आरोप करत तिने यामध्ये मी नाही असे स्पष्टपणे जाहीर केले आहे. नोराच्या आरोपांनंतर तिचा व्हिडिओ खूप चर्चेत आला, मात्र ती सुद्धा डीपफेक प्रकरणाची शिकार बनली आहे. नोराने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
एआयच्या मदतीने सध्या होत असलेले डीपफेक व्हिडिओ (Deepfake Video) प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. हा डीपफेक प्रकार थांबायचे नाव घेत नाही. रश्मिका मंदान्ना, कॅटरिना कैफ, आलिया भट्ट, काजोल यांच्यानंतर आता अभिनेत्री नोरा फतेही या व्हिडिओची शिकार झाली आहे. प्रसिद्ध डान्सर आणि बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीची (Nora Fatehi) डीपफेक व्हिडिओ समोर आल्यानंतर नोराला धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर नोराचा डीपफेक व्हिडिओ (Nora Fatehi Deepfake Video) तुफान व्हायरल होत आहे. नोरा फतेहीने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती दिली आहे. या व्हिडिओत ती म्हणते की, हा व्हिडिओ पाहून मला धक्का बसला आहे. व्हायरल होणाऱ्या डीफफेक व्हिडीओमध्ये, नोरा एका प्रोडक्टची जाहिरात करताना दिसत आहे. नोरा फतेहीचा चेहरा वापरून एक डीपफेक व्हिडिओ बनवण्यात आला असून तो व्हायरल होत आहे.
दरम्यान, नोव्हेंबर 2023 मध्ये अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा डीपफेकची शिकार झाली होती. रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही पहिली घटना होती. रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक व्हिडिओमधील मुलगी ब्रिटिश-भारतीय वंशाची झारा पटेल होती. आरोपींनी झारा पटेलच्या बॉडीवर रश्मिका मंदान्नाचा चेहरा लावला होता. दिल्ली पोलिसांनी आंध्र प्रदेशातून रश्मिका मंदान्नाचा डीपफेक तयार करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. याआधी डिसेंबरमध्ये चार आरोपी पकडले होते. मात्र, मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना आता यश आले आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Lulumelon Official (@lulumelon.official)

हेही वाचा

 Nora Fatehi ‘Deepfake’ Video : नोराही डीपफेकची बळी!

The post नोरा फतेहीचा ‘तो’ व्हायरल व्हिडिओ! डीपफेकचा आरोप करत म्हणाली… appeared first on Bharat Live News Media.

Go to Source