गडचिरोली : वैनगंगा नदी दुर्घटना; दोन महिलांचे मृतदेह सापडले

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: वैनगंगा नदीतून छोट्या नावेने प्रवास करीत असताना नाव उलटल्याने ६ महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२३) सकाळी ११ वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै) गावानजीक घडली. दोन महिलांचे मृतदेह सापडले असून अन्य महिलांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. Gadchiroli News जीजाबाई दादाजी राऊत (५५), पुष्पा मुक्तेश्वर झाडे(४२), रेवंता हरिश्चंद्र … The post गडचिरोली : वैनगंगा नदी दुर्घटना; दोन महिलांचे मृतदेह सापडले appeared first on पुढारी.

गडचिरोली : वैनगंगा नदी दुर्घटना; दोन महिलांचे मृतदेह सापडले

गडचिरोली, Bharat Live News Media वृत्तसेवा: वैनगंगा नदीतून छोट्या नावेने प्रवास करीत असताना नाव उलटल्याने ६ महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२३) सकाळी ११ वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै) गावानजीक घडली. दोन महिलांचे मृतदेह सापडले असून अन्य महिलांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. Gadchiroli News
जीजाबाई दादाजी राऊत (५५), पुष्पा मुक्तेश्वर झाडे(४२), रेवंता हरिश्चंद्र झाडे(४२), मायाबाई अशोक राऊत(४५), सुषमा सचिन राऊत(२४), बुधाबाई देवाजी राऊत(६५) सर्व रा. गणपूर (रै) अशी मृतांची नावे आहेत. दुपारी जीजाबाई राऊत व पुष्पा झाडे या दोघींचे मृतदेह सापडले. यातील सारुबाई सुरेश कस्तुरे (वय ५०) या महिलेला वाचविण्यात नावाड्याला यश आले. Gadchiroli News
गणपूर (रै) गावापासून काही अंतरावर वैनगंगा नदी आहे. नदीपलीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्याची सीमा प्रारंभ होते. नेहमीप्रमाणे आज गणपूर येथील काही महिला दोन छोट्या नावेने वैनगंगा नदीतून प्रवास करुन पलिकडच्या शेतात मिरची तोडण्यासाठी जात होत्या. दोन्ही नाव एकापाठोपाठ होत्या. चिचडोह प्रकल्पाचे पाणी सोडल्याने नदीपात्रात पाण्याची पातळीही वाढली आहे. शिवाय ढगाळ हवामान व वारा सुटल्याने नाव हेलकावे घेत होत्या. काही क्षणातच दोन्ही नाव उलटल्याने सर्व महिला पाण्यात बुडाल्या. मागची नाव खडकाजवळ उलटल्याने तेथील महिला कशाबशा बाहेर पडल्या. मात्र, पुढे गेलेली नाव खोल पाण्यात उलटली. यात सहा महिला बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर सारुबाई कस्तुरे ही महिला बचावली.
माहिती मिळताच गावकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची पाच बचाव पथके मृतदेह शोधण्याचे काम करीत आहेत. या घटनेमुळे गणपूर गावावर शोककळा पसरली आहे.
चिचडोहचे पाणी सोडणार असल्याची माहिती दिली नाही
कालपर्यंत वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी बरीच कमी होती. परंतु चामोर्शी तालुक्यातील चिचडोह प्रकल्पाचे पाणी काल रात्रीपासून सोडल्याने नदीत पाण्याची पातळी वाढली आहे. कोणत्याही प्रकल्पाचे पाणी सोडताना संबंधित यंत्रणेने परिसरातील नागरिकांना पूर्वसूचना देणे आवश्यक असते. मात्र, चिचडोह प्रकल्प यंत्रणेने पाणी सोडताना पूर्वसूचना दिली नाही. त्यामुळे महिलांना जीव गमवावा लागला, असा आरोप उपस्थित नागरिकांनी केला.
हेही वाचा 

चंद्रपूर : पतंग पकडण्याच्या मोह जीवावर बेतला; स्लॅबवरून पडून एकाचा मृत्यू
चंद्रपूर : कटलेली पतंग पकडण्याच्या मोहात स्‍लॅबवरून काेसळून एकाचा मृत्‍यू
चंद्रपूरात १६ आमदारांच्या निकालानंतर ठाकरे गट आक्रमक, काळे झेंडे दाखवत आंदोलन

Latest Marathi News गडचिरोली : वैनगंगा नदी दुर्घटना; दोन महिलांचे मृतदेह सापडले Brought to You By : Bharat Live News Media.