वाशिममध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

वाशिम: Bharat Live News Media वृत्तसेवा: वाशिमच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा वाशिम शहरातील अकोला नाका चौकात बसविण्यात येणार आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी संत, महंत धर्मगुरू यांच्या हस्ते पायाभरणी सोहळा आज (दि.२३) पार पडला. पुतळ्याचा लोकार्पण सोहळा १९ फेब्रुवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी होणार आहे.
यावेळी खासदार भावना गवळी, भाजपचे माजी आमदार विजय जाधव, पुरुषोत्तम राजगुरू यांच्यासह शिवसेना, भाजप आणि घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवप्रेमी उपस्थित होते.
वाशिम शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व्हावा, ही सर्व शिवप्रेमींची मागील कित्येक वर्षांपासून मागणी होती. ती मागणी आता पूर्ण होत आहे. या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी ७० लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. पुतळयाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छत्रपती संभाजीराजे यांच्याहस्ते करण्यात येणार आहे, असे खासदार भावना गवळी यांनी सांगितले.
हेही वाचा
वाशिम : देशी कट्ट्यातून गोळीबार; युवक गंभीर जखमी
वाशिम : घरफोडीत साडेसहा लाखांचा ऐवज लंपास; ड्रीमलँड सिटीमधील घटना
वाशिम : हळद प्रक्रिया यंत्रात अडकून एका महिला कामगाराचा मृत्यू!
Latest Marathi News वाशिममध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणार Brought to You By : Bharat Live News Media.
