विराटवर अनुष्का नाराज, पाहा सामन्यात काय झालं?
पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ल्ड कप 2023 च्या विजेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला २४० राेखले. प्रथम फलंदाजी करणार्या टीम इंडियाच्या फलंदाजांच्या आहे. या सामन्यादरम्यान एका-पाठोपाठ एक विकेट पडत असल्याचे पाहून अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीच्या रिॲक्शन व्हायरल झाल्या आहेत. (WC 2023 Final Photos)
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने सर्वबाद २४० धावा केल्या. या खेळीनंतर या अंतिम सामन्यातील काही क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे विराट कोहली आणि के एल राहूल या दोघांच्या विकेटमुळे टीम इंडियाच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. (WC 2023 Final Photos)
WC 2023 Final Photos : कोहलीच्या विकेटने अनुष्का नाराज
भारतीय संघाने विराट कोहलीची मोठी विकेट गमावली आहे. पॅट कमिन्सने कोहलीला क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. विराट तंबूत परतताना पत्नी अनुष्का शर्माचा चेहरा पडल्याचे पाहायला मिळाले. तिच्या चेहर्यावरील नाराजी स्पष्ट दिसली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या विश्वचषक सामन्यात भारताला विश्वचषक मिळणार या ठाम निर्धाराने अनेकजण आहेत. मात्र विराटच्या विकेटनंतर अनेकांमध्ये नाराजी पसरली. हिच नाराजी अनुष्काच्या चेहऱ्यावरही पहायला मिळाली.
राहूलच्या विकेटनंतर अथियाचा चेहरा फिका
कोहलीच्या विकेटनंतर काही षटकांनंतर केएल राहुलची विकेट गेली. या विकेटमुळे राहूलची पत्नी अथिया शेट्टीचाही चेहरा पडल्याचे पहायला मिळाले. राहूलच्या विकेटनंतर तिने तिचे दोन्ही हात तिच्या तोंडावर ठेवले होते. अथिया आणि अनुष्काच्या या रिॲक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा
Rohit Sharma World Cup Record : रोहित बनला एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार
India vs Australia World Cup 2023 Final | वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांत विराटने पाँटिंगला मागे टाकले
WC 2023 Final Photos : फायनलसाठी शाहरुख खान, दिपिकासह ‘या’ सेलिब्रिटींची हजेरी
Rohit Sharma Sixes Record : फायनलमध्ये रोहितने ठोकला ऐतिहासिक ‘षटकार’, ‘हा’ विक्रम मोडला
The post विराटवर अनुष्का नाराज, पाहा सामन्यात काय झालं? appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ल्ड कप 2023 च्या विजेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला २४० राेखले. प्रथम फलंदाजी करणार्या टीम इंडियाच्या फलंदाजांच्या आहे. या सामन्यादरम्यान एका-पाठोपाठ एक विकेट पडत असल्याचे पाहून अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीच्या रिॲक्शन व्हायरल झाल्या आहेत. (WC 2023 Final Photos) नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या …
The post विराटवर अनुष्का नाराज, पाहा सामन्यात काय झालं? appeared first on पुढारी.