मानुषी छिल्लर दिसणार ‘या’ नव्या चित्रपटात !

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर ( Manushi Chhillar ) , अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर “बडे मियाँ छोटे मियाँ ” या वर्षीच्या एप्रिलमध्ये ईदला प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या चित्रपटापैकी एक चित्रपट आहे. आता या चित्रपटात मिस वर्ल्ड मानुषी सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. २४ जानेवारीला या चित्रपटाचा टीझर लॉन्च होणार असून या … The post मानुषी छिल्लर दिसणार ‘या’ नव्या चित्रपटात ! appeared first on पुढारी.
मानुषी छिल्लर दिसणार ‘या’ नव्या चित्रपटात !

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर ( Manushi Chhillar ) , अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर “बडे मियाँ छोटे मियाँ ” या वर्षीच्या एप्रिलमध्ये ईदला प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या चित्रपटापैकी एक चित्रपट आहे. आता या चित्रपटात मिस वर्ल्ड मानुषी सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. २४ जानेवारीला या चित्रपटाचा टीझर लॉन्च होणार असून या बड्या कलाकारांसोबत आता मानुषी सुद्धा आपल्याला मोठ्या पद्यावर लवकरच दिसणार आहे.
संबंधित बातम्या 

Bigg Boss 17: फिनालेच्या स्पर्धेतून विक्की जैन बाहेर? टॉप ५ फायनलिस्ट पाहा
Appi Aamchi Collector : अप्पी-अर्जुनच्या बाळाचा जीव धोक्यात ?
Tharla Tar Mag! series : हनीमून नव्हे तर फ्रेंडमून; हनीमूनसाठी सायली-अर्जुन माथेरानला

मानुषी चिल्लर ( Manushi Chhillar ) सध्या सगळ्या कलाकारांसह जॉर्डनमध्ये शूट करत आहे. २ फेब्रुवारीपर्यंत तीन गाण्याच्या शूटींगसाठी चित्रपटाची सगळी टीम कामात बिझी असल्याची माहिती मिळत आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात मानुषी नेमकी काय भूमिका साकारणार आहे? हे निर्मात्यांनी अद्याप सांगितलं नाही. तरीही सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटात हॅकरची भूमिका करणार असल्याचे समजते.

हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. “बडे मियाँ छोटे मियाँ ” मध्ये अक्षय कुमारसोबत मानुषी स्क्रिन शेअर करणार आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ शिवाय मानुषी १६ फेब्रुवारी रोजी रिलीज होणाऱ्या तेलगू स्टार वरुण तेजसोबत तिचा द्विभाषिक चित्रपट “ऑपरेशन व्हॅलेंटाईन” मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Latest Marathi News मानुषी छिल्लर दिसणार ‘या’ नव्या चित्रपटात ! Brought to You By : Bharat Live News Media.