फिनालेच्या स्पर्धेतून विक्की जैन बाहेर? टॉप ५ फायनलिस्ट पाहा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बिग बॉस-१७ चा ग्रँड फिनाले २८ जानेवारीला होणार आहे. या शोचा विजेता त्यादिवशी ठरेल. दरम्यान, फिनालेच्या काही दिवस आधी एक प्रसिद्ध कंटेस्टेंट शोतून बाहेर झाला आहे. सलमान खानच्या या वादग्रस्त शोच्या ग्रँड फिनालेचा प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. शोमध्ये टॉप ५ फायनालिस्ट उरले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, विक्की जैन या शोतून बाहेर झाला आहे.
संबंधित बातम्या –
Tharla Tar Mag! series : हनीमून नव्हे तर फ्रेंडमून; हनीमूनसाठी सायली-अर्जुन माथेरानला
Lagnakallol Movie : मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधानचा ‘लग्नकल्लोळ’
Kiran Gaikwad : देवमाणूस फेम किरण गायकवाडचा ‘नाद’ येतोय, भोरमध्ये शूटिंग
फिनाले आधी विक्की जैन बेघर
मागील आठवड्यात शोतून आयशा खान आणि ईशा मालवीय घरातून बाहेर झाली होती. आता विक्की जैनचा प्रवास या शोतून संपला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फिनालेच्या काही दिवस आधी शोमध्ये मिडनाईट एविक्शन झाला, ज्यामध्ये विक्की जैनला घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
‘बिग बॉस १७’ चे टॉप ५ खेळाडू
बिग बॉस-१७ ला आपले ५ खेळाडू मिळाले आहेत. यापैकी एक विजेता ठरणार आहे. शो जिंकल्यानंतर ट्रॉफीचा हक्कदार कोण अशेल, हे त्यादिवशी ठरणार आहे. मुनव्वर फारूकी, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण शेट्टी हे कंटेस्टेंट शोमध्ये आहेत.
Latest Marathi News फिनालेच्या स्पर्धेतून विक्की जैन बाहेर? टॉप ५ फायनलिस्ट पाहा Brought to You By : Bharat Live News Media.
