कोल्हापूर : बांबवडेच्या उपसरपंचपदी दीपक निकम यांची बिनविरोध निवड  

बांबवडे : पुढारी वृत्तसेवा :  बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी दीपक हिंदुराव निकम यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच भगतसिंग चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत सर्व सदस्यांनी एकमताने निवड केली. आधीचे उपसरपंच स्वप्नील अशोक घोडे-पाटील यांनी आघाडी अंतर्गत समझोत्याप्रमाणे पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झाले होते. नूतन उपसरपंचपदी निवडीनंतर निकम यांच्या समर्थकांनी फटाक्यांची … The post कोल्हापूर : बांबवडेच्या उपसरपंचपदी दीपक निकम यांची बिनविरोध निवड   appeared first on पुढारी.

कोल्हापूर : बांबवडेच्या उपसरपंचपदी दीपक निकम यांची बिनविरोध निवड  

बांबवडे : Bharat Live News Media वृत्तसेवा :  बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी दीपक हिंदुराव निकम यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच भगतसिंग चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत सर्व सदस्यांनी एकमताने निवड केली. आधीचे उपसरपंच स्वप्नील अशोक घोडे-पाटील यांनी आघाडी अंतर्गत समझोत्याप्रमाणे पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झाले होते. नूतन उपसरपंचपदी निवडीनंतर निकम यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.
दरम्यान, प्रारंभी ग्रामसेवक धीरज कांबळे यांनी सदस्यांचे स्वागत केले. आणि सभेपुढील विषय पत्रिकेचे वाचन केले. निवडणूक प्रक्रियेत उपसरपंच पदासाठी सदस्य दीपक निकम यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाले. विहित वेळेत अन्य कोणाही सदस्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल न केल्याने सभाध्यक्ष सरपंच भगतसिंग चौगुले यांनी दीपक निकम यांची उपसरपंचपदी अविरोध निवड घोषित केली. यावेळी मावळते उपसरपंच स्वप्नील घोडे, सदस्य सुरेश नारकर, विद्यानंद यादव, दिग्विजय पाटील, मनीषा दीपक पाटील, शोभा संभाजी निकम, सीमा शरद निकम, वंदना बाजीराव बंडगर, कविता मुकुंद प्रभावळे, सुनीता विजय कांबळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा 

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण
कोल्हापूर येथील शाहूपुरीतील प्रसिद्ध राम मंदिर
कोल्हापूर : लॉज मालकाच्या खुनातील पिस्तूल मध्य प्रदेशातून खरेदी केल्याचे निष्पन्न

Latest Marathi News कोल्हापूर : बांबवडेच्या उपसरपंचपदी दीपक निकम यांची बिनविरोध निवड   Brought to You By : Bharat Live News Media.