Crime news : कॉम्रेड काकडेंवर भ्याड हल्ला

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  कॉम्रेड गंगाधर काकडे यांच्यावर अज्ञात तिघांनी भ्याड हल्ला करुन, त्यांना बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी 4ः30 च्या सुमारास ताहाराबाद शिवारात घडली. ताहाराबाद शिवारात पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरून काकडे घराकडे निघाले असता त्यांच्यावर अज्ञात तिघांनी हल्ला केला. तत्पूर्वी काकडे चिंचाळे फाट्यावरील पेट्रोल पंपावर गेले होते. गर्दी असल्याने पेट्रोल … The post Crime news : कॉम्रेड काकडेंवर भ्याड हल्ला appeared first on पुढारी.

Crime news : कॉम्रेड काकडेंवर भ्याड हल्ला

राहुरी : Bharat Live News Media वृत्तसेवा :  कॉम्रेड गंगाधर काकडे यांच्यावर अज्ञात तिघांनी भ्याड हल्ला करुन, त्यांना बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी 4ः30 च्या सुमारास ताहाराबाद शिवारात घडली. ताहाराबाद शिवारात पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरून काकडे घराकडे निघाले असता त्यांच्यावर अज्ञात तिघांनी हल्ला केला. तत्पूर्वी काकडे चिंचाळे फाट्यावरील पेट्रोल पंपावर गेले होते. गर्दी असल्याने पेट्रोल भरण्यास लाईनमध्ये ते उभे होते. यावेळी दुचाकीवरुन ट्रिपल शीट तिघे अनोळखी तेथे आले. पेट्रोल भरण्यास लाईनमध्ये उभे न राहता मध्ये दुचाकी घुसवून ते पुढे सरकले. ‘लाइन तोडुन पुढे का गेला’, अशी काकडे यांनी त्यांना विचारणा केली. याचा राग आल्याने तिघांनी काकडे यांना शिवीगाळ करुन दमदाटी केली.
दरम्यान, दुचाकीमध्ये पेट्रोल न भरता काकडे तेथुन निघून गेले. चिंचाळे फाट्यापासून 500 मीटर अंतरावर महिपती महाराज पेट्रोल पंपावर पेट्रोल भरुन ते घराकडे निघाले होते. ताहाराबाद शिवारात राहुरी- म्हैसगाव रस्त्यावर शिवीगाळ करणार्‍या तिघांनी काकडे यांची दुचाकी अडविली. पुन्हा शिवीगाळ करुन त्यांना लाथाबुक्क्यांनी डोके व कानावर जबर मारहाण केली. मारहाण व झटापटीत काकडे यांचे 5 हजार रुपये गहाळ झाले. हल्लेखोरांनी काकडे यांचा हात पिरगाळुन बोटातील सोन्याची अंगठी काढून घेत पसार झाले.
हल्ल्याची माहिती काकडे यांनी पत्नी, भाऊ डॉ. सुभाष काकडे व नातेवाईकांना दिली. गंगाधर काकडे यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिली. अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पो. नि. संजय ठेंगे व पो.उ. नि. धर्मराज पाटील करीत आहेत.
हेही वाचा :

Ram Lalla Darshan: अयोध्येत अडीच ते तीन लाख भाविकांनी घेतले रामलल्लाचे दर्शन
चिंता वाढली ! उजनी धरण जानेवारीत महिन्यातच उणे पातळीवर

Latest Marathi News Crime news : कॉम्रेड काकडेंवर भ्याड हल्ला Brought to You By : Bharat Live News Media.