दरेगाव शिवारात अपघात ; दुचाकीस्वार ठार

चांदवड (जि. नाशिक) : Bharat Live News Media वृत्तसेवा– तालुक्यातील दरेगाव शिवारातील कोकणखेडे रोडवर भरधाव दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी दगडाच्या गंजावर पडल्याने झालेल्या अपघातात चालक ठार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी चांदवड पोलिसांत सोमनाथ बबन गांगुर्डे (४३, रा. दरेगाव) यांनी फिर्याद दिल्याने अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरेगाव येथील भगवान मुरलीधर सोनवणे (५०) हे दुगावकडून दरेगावकडे दुचाकीने (एमएच ४१, एच ९९१३) कोकणकडे जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडाच्या गंजावर दुचाकी आदळल्याने, सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कैलास वाघ, पोलिस हवालदार भाऊसाहेब सांगळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
हेही वाचा :
Dr. Babanrao Taiwade | …तर ओबीसी समाजही मुंबईकडे कूच करेल : डॉ. बबनराव तायवाडे
Movie Sridevi Prasanna : सई ताम्हणकर-सिद्धार्थच्या चित्रपटाचे “दिल में बजी गिटार” गाणं प्रदर्शित
Ram Mandir-Anushka Sharma : व्हायरल झालेल्या फोटोत अनुष्का? काय म्हणतात नेटकरी…
Latest Marathi News दरेगाव शिवारात अपघात ; दुचाकीस्वार ठार Brought to You By : Bharat Live News Media.
