Crime news : कोल्हार घाटात दाम्पत्याला लुटले

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगरहून जेऊर-कोल्हारमार्गे पाथर्डीला दुचाकीवर चाललेल्या पती-पत्नीला कोल्हार घाटात अडवून तीन अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ओरबाडून नेले. ही घटना रविवारी (दि.21) दुपारी 1 ते 1.30 च्या सुमारास घडली. याबाबत संगीता सारंगधर वांढेकर (रा. विद्या कॉलनी, आदर्श नगर, कल्याण रोड) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद … The post Crime news : कोल्हार घाटात दाम्पत्याला लुटले appeared first on पुढारी.

Crime news : कोल्हार घाटात दाम्पत्याला लुटले

वाळकी : Bharat Live News Media वृत्तसेवा : नगरहून जेऊर-कोल्हारमार्गे पाथर्डीला दुचाकीवर चाललेल्या पती-पत्नीला कोल्हार घाटात अडवून तीन अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ओरबाडून नेले. ही घटना रविवारी (दि.21) दुपारी 1 ते 1.30 च्या सुमारास घडली. याबाबत संगीता सारंगधर वांढेकर (रा. विद्या कॉलनी, आदर्श नगर, कल्याण रोड) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी संगीता व त्यांचे पती सारंगधर वांढेकर हे रविवारी (दि. 21) दुपारी पाथर्डीतील जोडमोहोज येथे त्यांच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी दुचाकीवर जेऊर-कोल्हारमार्गे जात होते.
कोल्हार घाटात गेल्यावर पाठीमागून एका मोटरसायकलवर दोघेजण आले व त्यांनी तुम्ही आमच्या मोटरसायकलला कट का मारला असे म्हणत हुज्जत घालायला सुरुवात केली. फिर्यादी संगीता यांचे पती त्यांच्याशी चर्चा करत त्यांना समजून सांगत असताना त्या तिघांमधील एक जण संगीता यांच्याजवळ आला व त्याने त्यांच्या गळ्यातील मिनी व मोठे गंठण हिसका मारून तोडले आणि ते घेऊन ते तिघे काही क्षणातच मोटरसायकलवर बसून कोल्हारच्या दिशेने पसार झाले.
 
 
Latest Marathi News Crime news : कोल्हार घाटात दाम्पत्याला लुटले Brought to You By : Bharat Live News Media.