Nagar : दिल्लीगेटला श्रीराम मंदिराची प्रतिकृती

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील दिल्लीगेट परिसरात श्री शनी मारुती मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर विश्वस्त मंडळाचे सदस्य अश्विन सातपुते यांच्या पुढाकारातून अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधत भव्य राम मंदिर प्रतिकृती देखावा उभारण्यात आला आहे.  प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी उपस्थितांनी दिलेल्या जय श्रीराम.. प्रभू श्री रामचंद्र की जय.. सियावर रामचंद्र की जय.. अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. … The post Nagar : दिल्लीगेटला श्रीराम मंदिराची प्रतिकृती appeared first on पुढारी.

Nagar : दिल्लीगेटला श्रीराम मंदिराची प्रतिकृती

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा :  शहरातील दिल्लीगेट परिसरात श्री शनी मारुती मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर विश्वस्त मंडळाचे सदस्य अश्विन सातपुते यांच्या पुढाकारातून अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधत भव्य राम मंदिर प्रतिकृती देखावा उभारण्यात आला आहे.  प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी उपस्थितांनी दिलेल्या जय श्रीराम.. प्रभू श्री रामचंद्र की जय.. सियावर रामचंद्र की जय.. अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. राम मंदिर प्रतिकृती देखावा नागरिकांना पाहण्यासाठी 30 जानेवारीपर्यंत ठेवण्यात येणार आहे. श्री शनि मारुती विश्वस्त मंडळाच्या वतीने मंदिरात राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत प्रमुख नानासाहेब जाधव यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
संबंधित बातम्या :

रामनामाने दणाणला पुणे जिल्हा !
Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रकरणी क्युरेटिव्ह पिटीशनवर बुधवारी सुनावणी
अंगणवाडी सेविका आंदोलन : आंदोलनाची पन्नाशी, आमदारांच्या दाराशी

मंदिर समितीच्या वतीने उपस्थित पाहुण्यांना श्रीरामचंद्रप्रभू यांचा श्रीरामचरितमानस ग्रंथ व शाल देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी चंद्रकांत आकडे, अध्यक्ष मच्छिंद्र डवरे, उपाध्यक्ष लक्ष्मण इगे, सचिव अतुल पिंपरकर, सहसचिव महेंद्र मानकर, खजिनदार बाळू सांगोळे, सहखजिनदार सागर गुंजाळ, कायदेशीर सल्लागार सुभाष मानकर, सदस्य माधव टांगसाळे, अश्विन सातपुते, अमोल नागापुरे, भैय्या वाबळे व आदेश लांजेकर, वर्धमान पितळे, नीलेश लोढा, शनि मारुती मंदिर विश्वस्त मंडळ, काशीविश्वेश्वर मित्र मंडळ व तोफखाना तरुण मंडळचे सर्व सदस्य उपस्थित होते.
शनि मारुती मंदिराच्या भिंतीवर शिवसृष्टी साकारणार
श्री शनि मारुती मंदिराच्या भिंतीवर शिवसृष्टी साकारणार असल्याचे यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. दिल्लीगेट परिसराला ऐतिहासिक वारसा आहे. येथे नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा जोपासण्याचे काम केले जाईल. शिवसृष्टीने शहराच्या विकासात आणखीन भर पडेल, असे ते म्हणाले.
Latest Marathi News Nagar : दिल्लीगेटला श्रीराम मंदिराची प्रतिकृती Brought to You By : Bharat Live News Media.